जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गाराही पडल्या
By चुडामण.बोरसे | Published: June 4, 2023 03:19 PM2023-06-04T15:19:42+5:302023-06-04T15:20:00+5:30
अडावद ता.चोपडानजीक मोठे झाड कोसळले. त्यामुळे अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर वाहनांच्या पाच कि. मी. लांब रांगा लागल्या आहेत.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारा पडल्या. झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित झाला आहे. अडावद ता.चोपडानजीक मोठे झाड कोसळले. त्यामुळे अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर वाहनांच्या पाच कि. मी. लांब रांगा लागल्या आहेत.
पाचोरा तालुक्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस झाला. अनेक वृक्ष पडले. कळमडू ते धामणगाव रस्त्यावर अनेक वृक्ष पडल्याने रस्ता झाला बंद झाला आहे, नुकत्यात लागवड केलेल्या कोवळ्या कपाशी पिकांचे गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.