आसाममध्ये पाऊस : ६ रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:07 PM2017-08-17T17:07:22+5:302017-08-17T17:09:03+5:30

आसाम राज्यातून येणाºया गुवाहाटी-एलटीटी, कामाख्या एक्स्प्रेसचा समावेश.

Rain in Assam: 6 trains canceled | आसाममध्ये पाऊस : ६ रेल्वे गाड्या रद्द

आसाममध्ये पाऊस : ६ रेल्वे गाड्या रद्द

Next

आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.१७ - आसाम राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्या राज्यातून येणाºया व मुंबईकडे जाणाºया सहा गाड्या रेल्वे प्रशासनातर्फे रद्द करण्यात आल्याची माहिती येथील रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 
गाडी क्र.१५६४७ लोकमान्य टिळक टर्मिनल गुवाहाटी एक्स्प्रेस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.०५ वाजता सुटणारी व देवळाली येथे सकाळी ११.०८ वाजता, नाशिक ११.२३, मनमाड १२.१०, भुसावळ २.३०, बºहाणपूर दुपारी ३.२३, खंडवा रात्री ८.०५ वाजता येणारी व १८ आॅगस्ट रोजी सुटणारी रद्द करण्यात आली आहे. 
गाडी क्र. १५६४५ एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस ही एलटीटीवरून सकाळी ८.०५ वाजता सुटणारी देवळाली ११.०८, नाशिक रोड ११.२३, मनमाड १२.१०, भुसावळ दुपारी २.३०, बºहाणपूर ३.२३, खंडवा रात्री ८.०५ वाजता येणारी व  १९ आॅगस्ट रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आलेली आहे. 
१५ आॅगस्ट रोजी गाडी क्र.१५६४६ गोहाटी एलटीटी एक्स्प्रेस  गुवाहाटीहुन निघणारी व २० आॅगस्टला खंडवा सकाळी १०.००,बºहाणपूर ११.००, भुसावळ ११.४५, मनमाड दुपारी ०२.०२, नाशिक दुपारी ३.२०, देवळाली दुपारी ३.२३ वाजता येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 
२० आॅगस्ट रोजी गाडी क्र.१५५१९ एलटीटी-कामाख्या स्थानकाहून सायंकाळी ७.५० ला सुटणारी नाशिक सकाळी ११.०३, मनमाड ११.५३, जळगाव दुपारी ०१.३३,  भुसावळ दुपारी २.००, खंडवा ४.१५ वाजता पोहचणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 
२३ आॅगस्ट रोजी गाडी क्र.२२५११ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस एलटीटीहुन सकाळी ११.३० वाजता सुटणारी व मनमाड येथे दुपारी ४.१८, भुसावळ सायंकाळी ६.३०, अकोला रात्री ८.३५ वाजता पोहोचणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
१९ आॅगस्ट रोजी गाडी क्र.१२५१९ कामाख्या-एलटीटी, कामाख्याहुन सकाळी सहा वाजता निघणारी व २१  आॅगस्ट रोजी अकोला येथे दुपारी १२.१९, भुसावळ दुपारी २.१०, मनमाड ४.२७ वाजता पोहोचणारी प्रवासी गाडी रद्द करण्यात आली आहे. 

Web Title: Rain in Assam: 6 trains canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.