पावसाची दमदार ‘बॅटींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:41 PM2020-07-05T12:41:34+5:302020-07-05T12:42:06+5:30

हवेत गारवा, चाळीस मिनिटे आनंदवर्षा

Rain 'Batting' | पावसाची दमदार ‘बॅटींग’

पावसाची दमदार ‘बॅटींग’

Next

जळगाव : शहर आणि परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या शेतकरीराजाला पावसाने आपल्या ‘एन्ट्री’ने खूष करून टाकले आहे. चाळीस मिनिटे पडलेल्या या पावसाने हवेत गारवाही निर्माण झाला होता.
जळगाव शहर आणि परिसरात गेले आठ दिवस पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. त्याचबरोबर हवेत उष्माही निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकही पावसाच्या प्रतिक्षेत होते. या साऱ्यांनाच पावसाने दमदार पुनरागमन करत गारवा दिला.
यापूर्वी पावसाने चक्रीवादळाच्या वेळी हजेरी लावली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीही जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवली. पाऊस नसल्याने अनेक पिके संकटात आली होती. जिल्ह्यातील ८८ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाऊस नसल्याने कदाचित दुबार पेरणीचे संकट तर ओढवणार नाही ना, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत होती. दि. २ जुलैपासून पाऊस बरसेल, हा हवामान खात्याचा अंदाजही पावसाने खोटा ठरवला होता. मात्र, शनिवारी आलेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. रिमझिम बरसणाºया पावसाने काहीवेळातच मुसळधार रुप धारण केले. जवळपास चाळीस मिनिटे हा पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.
वीजपुरवठा खंडित
पावसामुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसर, रायसोनीनगर, जिल्हा पेठ, दिक्षित वाडी, जयकिसनवाडी, पिंप्राळा, महाबळ, गणेश कॉलनी यासह शहरातील वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

Web Title: Rain 'Batting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव