भुसावळसह यावल तालुक्यात पावसाची हजेरी
By Admin | Published: June 11, 2017 11:40 AM2017-06-11T11:40:01+5:302017-06-11T11:40:01+5:30
भुसावळसह यावल तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवारच्या सकाळर्पयत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ/यावल,दि.11 - भुसावळसह यावल तालुक्यात शनिवारी रात्रीपासून रविवारच्या सकाळर्पयत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत़ रस्ते जलमय झाले असून शेत-शिवारातही पाणी साचल्याचे चित्र होत़े
भुसावळ- शहर व तालुक्यात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला पावसाचा जोर नसलातरी नंतर मात्र वेग वाढला़ वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ सकाळी सात वाजेर्पयत पाऊस सुरूच असल्याने शहरवासीयांचे चांगलेच झाल़े शहराचा रविवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना गैरसोय झाली़ शेत-शिवारात सर्वत्र पाणी साचले होत़े
यावल शहरासह तालुक्यात रविवारी पहाटे पावसाने सर्वत्र हजेरी लावली. तालुक्यात 12 मिलीमीटर पाऊस झाला़ पाऊस दमदार नसला तरी तालुक्यात पावसाळी वातावरण कायम असल्याने व पावसाची शक्यता असल्याने खरीपाची पेरणीसाठी सज्ज असलेला शेतकरी येत्या दोन दिवसांत पेरणीस सुरुवात करणार आह़े
रविवारी तालुक्यात झालेला मंडळ निहाय पाऊस- यावल 29़2, भालोद- 8़4, बामणोद- 12़4, किनगाव- 8़2, साकळी- 6़2़ फैजपूर- 7़4़