चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 03:33 PM2019-10-23T15:33:21+5:302019-10-23T15:34:26+5:30

हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले.

Rain falls in Chalisgaon after the house collapses | चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर

चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देएक लाखापर्यंत वित्त हानीअचानक घराची भिंत कोसळली अन् कुटुंब पडले घराबाहेरक्षणातच १२ पत्र्यांचे घर झाले जमीनदोस्त

संजय सोनार
चाळीसगाव, जि.जळगाव : हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. यात एक लाख रुपयांपर्यंत वित्तहानी झाली आहे. घर पडल्याने या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
मंगळवारी रात्री पाऊस सुरू असल्याने हे कुटुंब घरातच बसून होते. अचानकपणे घराची एक भिंत कोसळताच सर्वजण घाबरून बाहेर पडले आणि काही क्षणातच १२ पत्र्यांचे घर जमीनदोस्त झाले.
अगदी थोडक्यात कुटुंबाला होणारी इजा टळली. आताही हे कुटुंब घराबाहेर बसून शासनाच्या मदतीची वाट पहात आहे.
पत्नी, चार मुले व वडील असा यांचा परिवार आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून शासकीय मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Rain falls in Chalisgaon after the house collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.