चिनावल परिसरात पाऊस, वादळी वाऱ्यांनी नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:12 PM2019-05-30T21:12:36+5:302019-05-30T21:12:42+5:30

केळी बागा आडव्या : रोहिणी बरसल्याने वातावरणात गारवा

Rainfall in Chinawal area, damaged by wind storms | चिनावल परिसरात पाऊस, वादळी वाऱ्यांनी नुकसान

चिनावल परिसरात पाऊस, वादळी वाऱ्यांनी नुकसान

googlenewsNext

चिनावल, जि.जळगाव : चिनावलसह परिसरात गुरुवार ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक ते दीड तास वादळी वाºयासह जोरदार पडल्याने केळी बागांचे नुकसान झाले.
प्रचंड उष्णतेने हैराण झालेले आबालवृद्ध आज झालेल्या रोहिण्यांच्या पावसाने सुखावले असले तरी वादळी वाºयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागेतील केळी खोड उपटून पडले आहेत. तसेच परिसरातील जुने वृक्ष, विजेच्या तारा तुुटल्याने शिवाय काही घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. रोहिणी नक्षत्रावर झालेल्या दमदार पावसाने सुरुवात तर चांगली झाली आहे. मात्र यापुढे असाच पाऊस पडत राहावा अशी शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे. दरम्यान आजच्या वादळी वाºयासह झालेल्या पावसाने चिनावल, खिरोदा, कोचूर, वाघोदा, वडगाव या शिवारातील अनेक शेतकºयांचे नुकसान झाले आहे.
दहिगावसह परिसरातही पाऊस
यावलता लुक्यातील दहिगावसह परिसरात येथे आणि परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहिणी किरकोळ स्वरूपात बरसल्या. दुपारी बारा वाजेपासून उष्णतेचे प्रमाण वाढले होते, मात्र तीन वाजेच्या सुमारास रोहिणी किरकोळ स्वरूपात बसल्या त्यामुळे काही वेळ का होईना गारवा निर्माण झाला होता.

Web Title: Rainfall in Chinawal area, damaged by wind storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.