अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:24 PM2020-03-19T12:24:16+5:302020-03-19T12:25:08+5:30

निम्म्याहून अधिक तडाखा चोपडा तालुक्यात

Rainfall kills 4,000 farmers in Jalgaon district | अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३० हजार २६०.९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार १९.७० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या वादळाने हिरावला आहे.
मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे सर्व ३३ टक्केच्यावर नुकसान आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. यात सर्वाधिक सात हजार १०० हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्टरवरील गव्हाला तर पाच हजार ८७० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. यामध्ये तालुक्यातील ९२ गावांमधील २०६९१ शेतकºयांच्या ३८३२ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले असून ३७८७ हेक्टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे २०८८ हेक्टरवरील केळी, २०७६ हेक्टरवरील हरभरा, १६७२ हेक्टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे.
जळगाव तालुक्यातील ३३ गावांमध्ये ३४५२ शेतकºयांचे ७८२६ हेक्टरवर तर अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये ४६१३ शेतकºयांचे ३५८९.९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Rainfall kills 4,000 farmers in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव