पारोळा तालुक्यात पावसाने झोडपले : पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 09:21 PM2019-09-18T21:21:51+5:302019-09-18T21:21:57+5:30
सर्व प्रमुख प्रकल्प फुल्ल
Next
पारोळा : तालुक्यात बुधवारी दुपारी पावसाने मुसळदार हजेरी लावली. यामुळे मका, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरसमनी, देवगाव चहूत्रेसह परिसरात पावसाने झोडपल्याने पिके मोडली आहेत. शेतातील पाणी बाहेर निघत नसल्याने कापसाच्या कैऱ्या सडत आहेत.
मका पिकावर लष्करी अळी पडल्यामुळे पीक हातचे गेले आहे. गेल्या ४ ते ५ वर्षात झाला नाही एवढा पाऊस या वर्षी झाल्याने तालुक्यातील सर्व प्रमुख प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. १८ रोजी बोरी धरणाचे पाच गेट उघडण्यात आले. नद पात्रात २२०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता.