जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकाव, रब्बीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:02 PM2018-02-11T12:02:16+5:302018-02-11T12:06:58+5:30

दोन दिवसांपासून ञगाळ वातावरण

Rainfall of rain in Jalgaon, Dhule district | जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकाव, रब्बीला फटका

जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकाव, रब्बीला फटका

googlenewsNext
ठळक मुद्देशेतक-यांची तारांबळखानापूर येथेही विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. ११ - जळगाव व धुळे जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाचा शिडकाव झाला. या मुळे हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकाव झाला. यामध्ये धुळे शहरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाचा शिडकाव झाला. तसेच जळगाव शहरातही सकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील खानापूर येथेही विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी संध्याकाळीदेखील भडगाव तालुक्यात पावसाचा शिडकाव झाला. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
शेतक-यांची तारांबळ
सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकºयांची तारांबळ उडाली.

Web Title: Rainfall of rain in Jalgaon, Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.