रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे पर्जन्य याग यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:38 PM2019-06-05T23:38:04+5:302019-06-05T23:39:49+5:30
थोरगव्हाण येथील दैवत कालभैरवनाथ मंदिर परिसरात अमावस्येला रात्री पर्जन्य याग यज्ञ करण्यात आला.
सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील दैवत कालभैरवनाथ मंदिर परिसरात अमावस्येला रात्री पर्जन्य याग यज्ञ करण्यात आला.
श्री कालभैरव नाथ यांची प्रभावी सेवा व वरूणराजाची परिसरावर कृपा व्हावी याकरिता पर्जन्य याग होमहवन उपस्थित चार हजार स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी केला.
श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती, त्रिदेवांच्या चरणापाशी, आदिशक्ती आहे. आदिशक्तीच्या पायाशी श्री काळभैरव आहेत. श्री कालभैरवाच्या अधिन काळ आणि वेळ आहे.
कालभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणाºया संकटांंपासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या अनुषंगाने वरुणराजाची कृपा व्हावी यासाठी अमावस्येच्या मुहूर्र्तावर ते पण दुसरा प्रहर रात्री ९ ते १० या काळात कालभैरव यांचा मानसन्मान हार, नारळ, खडीसाखर, दक्षिणा ठेवून ११ वेळा कालभैरव अष्टक पठण करणे, बटूक भैरव स्तोत्र वाचन, कालभैरव मंत्र उच्चारणही करण्यात आले.
ही सेवा गेल्या ६० महिन्यांपासून सुरू असून दर अमावसेला येथे सेवा केली जाते.ही सेवा रात्री १0.३० पर्यंत सुरू होती मोठया श्रदेने भाविक येते अमावसेला येत असतात