संस्कारी पिढीसाठी मुलांच्या संवेदना जपा : अॅड़ अपर्णा रामतीर्थकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 09:16 PM2018-06-29T21:16:22+5:302018-06-29T21:19:21+5:30
आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.
जळगाव : आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.
अॅड़ अच्युतराव अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवर्य अॅड़ अ़वा़अत्रे प्रतिष्ठानतर्फे २९ जून रोजी कांताई सभागृहात सायंकाळी अॅड़अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘पालकांशी हितगुज’ या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या.
संस्कृतीचा विनाश दारात उभा
आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच अॅड़रामतीर्थकर यांनी आपण मुलांना संस्कार देण्यात कमी पडत असल्याचा उल्लेख करून नात्यांमधील ओलावा संपत असल्याची खंत व्यक्त केली. आज ‘आई’ सर्वत्र शोधावी लागत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आपण कसे दिसतो यापेक्षा मी कशी आहे हे ओळखा. बाहेरचे धोके मुलांना कळावे म्हणून आईने सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. मुलांच्या हाती मोबाईल देऊन ते काय पाहत आहे, याकडे आपण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वेगवेगळ््या ‘फेस्टीवल’ तसेच गेमच्या आहारी मुले जात आहे. त्यामुळे संस्कृतीचा विनाश दारात उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी वेळीच जागे, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.
मुलांचे कौतूक करा
आज कुटुंब व्यवस्थेचा पाया खचत असून मुले पालकांपेक्षा बाहेर मित्रांमध्ये जास्त रमत आहे. त्यामुळे मुलांना किमान दोन तास वेळ देत त्यांच्या भावना जपा, त्यांचे कौतूक करणे शिका, त्यांना दाद द्या. त्यामुळे ते बाहेर रमण्यापेक्षा घरात रमतील, असेही अॅड. रामतीर्थकर म्हणाल्या.
मुलींसाठी पालकांची भूमिका महत्त्वाची
मुलीची वडिलांशी तर मुलाची आईशी जवळीक असते. त्यामुळे वडिलांनी पत्नीसोबतच मुलीचेही कौतूक केले पाहिजे, असे सांगून त्यांनी मुलांवर वाचनाचे संस्कार करण्याचा सल्ला दिला. आज सर्व सुखसोयी घरात असल्या तरी आपण ‘बेडरुम’ तयार करून दुरावा निर्माण केल्याचे सांगून त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला दिला.
प्रारंभी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड.अशोक माथूर वैश्य, प्रतिमा अत्रे, सदस्य अॅड. सुशील अत्रे, अनिल कांकरिया यांच्या उपस्थितीत अॅड़अच्युतराव अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक पद्मजा अत्रे यांनी केले.सूत्रसंचालन सोनिका मुजूमदार यांनी तर आभार लीना कुलकर्णी यांनी मानले.