‘बेलगंगा’ लिलावावरील स्थगिती उठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 07:59 PM2017-07-31T19:59:40+5:302017-07-31T19:59:40+5:30
जिल्हा बँकेतर्फे लिलाव केलेला आणि चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेतलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या व्दिसदस्यीय पीठाने आज उठवली.
चाळीसगाव (जि. जळगाव), दि. ३१ - जिल्हा बँकेतर्फे लिलाव केलेला आणि चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीने विकत घेतलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती औरंगाबाद खंडपीठाच्या व्दिसदस्यीय पीठाने आज उठवली. यामुळे कारखान्याच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंबाजी ट्रेडींग कंपनीने कारखाना ३९ कोटी २२ लाखास विकत घेतल्यानंतर बेलगंगा कर्मचारी युनियन तर्फे आपली पगारासह इतर देणी मिळावी म्हणून कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. सोमवारी अंबाजी ट्रेडींग कंपनीतर्फे अॅड.धनंजय ठोके यांनी तर बँकेच्या वतीने अॅड.व्ही.डी.साळुंखे, युनियन तर्फे अॅड.सुरेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व मंगेश पाटील ऐकून लिलाव प्रक्रियेवरील अंतरीम स्थगिती उठवली. सदरची याचिका प्रलंबित ठेवतांनाच कारखान्याच्या लिलावाचा मार्ग मोकळा केला.
कारखान्या संदर्भात काय निर्णय लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी अंबाजी ट्रेडींग कंपनीचे प्रवर्तक व काराखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी लिलावात भाग घेऊन कारखाना विकत घेतला आहे.
लिलावावरील स्थगिती न्यालयाने उठवल्याने कारखाना सुरु होण्याचा अडथळा दूर झाला आहे. कामगारांनाही न्याय देण्याची भूमिका आम्ही प्रथम पासूनच घेतली आहे. कारखाना हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने येत्या गळीत हंगामात तो सुरु करणार आहोत.
-चित्रसेन पाटील,
माजी चेअरमन बेलगंगा सह. साखर कारखाना