आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सन्मानाने जगण्याची उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:45 PM2020-11-07T15:45:53+5:302020-11-07T15:46:54+5:30

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेत

Raises the family to live with dignity | आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सन्मानाने जगण्याची उभारी

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सन्मानाने जगण्याची उभारी

Next

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेत
कर्जबाजारी झाल्याने किंवा निसर्गाने तोंड फिरवल्याने मोठा आर्थिक फटका बसला की अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शासन राजकीय आणि सामाजिक नेते तेवढ्यापुरते सहानुभूती दाखवून मदतीचे आश्वासन देऊन निघून जातात. नंतर मात्र प्रत्यक्ष अर्ज करण्याससुद्धा मदत केली जात नाही एव्हडी हेळसांड त्या कुटुंबाची होते. अगदी शासकीय पातळीवरदेखील तलाठी किंवा इतर अधिकारी साधा वारस लावण्यासाठी मदतीऐवजी फिरवाफिरव करून अनेकदा त्यांची आर्थिक लूट केल्याचेही उघडकीस आले आहे. समाजात या कुटुंबाची पत रहात नाही म्हणून आयुक्त गमे यांनी या पीडितांच्या व्यथा जाणून त्यांच्याबद्दलची सहानुभूती जागृत करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, स्वावलंबी व्हावे म्हणून उभारी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
उभारी योजनेंतर्गत गमे यांनी महसूल विभागातील पालक अधिकारी नेमले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तेथे पालक अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांचे सर्वेक्षण करायचे त्या त्या कुटुंबाची जबाबदारी पालक अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या पीडित नागरिकांच्या प्रती वर्तणुकीतदेखील आपोआप बदल होऊ लागले आहेत.
पालक अधिकाऱ्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला महसूल विभाग, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडवायच्या आहेत त्यांच्या वारसांना कागदोपत्री सर्व मदत व सहकार्य करायचे आहे त्या कुटुंबाना संजय गांधी, इंदिरा गांधी, कुटुंब अर्थसहाय्य, प्राधान्य कुटुंब योजना यात जेथे पात्र ठरतील त्याचा लाभ देणे तसेच बांधावरील वृक्ष लागवड, घरकुल योजना, गोठा शेड, कृषी विभागाच्या फळबाग योजना, बियाणे, अवजार वाटप यात लाभ व रोजगार मिळवून देणे आदी कामे करायची असून विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्या पीडित कुटुंबातील मुलांचे शिक्षण, नोकरी यासाठी मदत मिळवून द्यायची आदी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने पालक अधिकारी कामास लागले आहेत. अमळनेर तालुक्यात ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून एक कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करून दिला आहे तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील स्थानिक प्रांत व तहसीलदार या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्याचे काम निव्वळ नाशिक विभागात केले जात आहे ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. गमे यांचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे तर भ्रष्टाचाराचा बट्टा लागलेले महसूल कर्मचारी संपूर्ण राज्यात आदर्श ठरतील.

आयुक्त गमे यांच्या उभारी संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढली आहे. निराधार कुटुंबाला मदत करून त्यांच्या जीवनाची दिशा बदलल्याचे समाधान देखील मिळत आहे.-
मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार,अमळनेर

Web Title: Raises the family to live with dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.