राजा कि आई बारात' मात्र मोजक्याच वऱ्हाडीच्या उपस्थितीत फैजपूरला पहिल्याच मुहूर्ताला अनेकांनी उडविला लग्नाचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 03:30 PM2020-11-27T15:30:02+5:302020-11-27T15:32:10+5:30
गुरुवारच्या तुळशी विवाहानंतर दि.२७ च्या पहिल्याच लग्न मुहूर्ताला अनेकांनी लग्नाचा बार उडविला.
Next
फ जपूर : गुरुवारच्या तुळशी विवाहानंतर दि.२७ च्या पहिल्याच लग्न मुहूर्ताला अनेकांनी लग्नाचा बार उडविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'राजा कि आई बारात' मात्र मोजक्याच वऱ्हाडी मंडळीत हे विवाह सोहळे पार पडले. शहरातील सर्व लहान-मोठे मंगल कार्यालय, लॉन, देवस्थान बुक होते.कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात रुग्णसंख्येचाही वेगही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे लग्न सोहळयांना परवानगी तर मिळत आहे, मात्र केवळ २०० वराडी मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळे आटोपशीर करावे लागत आहेत. मात्र या बंधनांमुळे लग्न सोहळ्यांवर अवलंबून असलेल्या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.गुरुवारी तुळशी विवाह पार पडल्यानंतर दि. २७ रोजी शुक्रवारपासून लग्न कार्याला सुरुवात झाली. पहिल्याच मुहूर्ताला अनेक वर-वधूनी लग्नाचा बार उडवला. शहरातील देवस्थानांसह लहान-मोठे मंगल कार्यालय, लॉन लग्न सोहळ्यासाठी बुक होेते. लग्न सोहळ्याला वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती. मात्र तीही मोजकीच अनेक ठिकाणी डीजे बँडऐवजी मंगल वाद्य वाजवताना दिसत होते तर नवरदेवाची वरातसुद्धा जवळूनच फिरवून आणावी लागत होती. अगदी हौस म्हणून काय तर रात्रीच्या बिज मिरवणुकीऐवजी लग्न घरात अथवा मंगल कार्यालयात धमाल झाली. मात्र त्यालाही रात्री वेळेची बंधने होती. त्यामुळे अतिशय आटोपशीर पद्धतीने मोजक्या नातेवाईक वराडी मंडळींच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करुन विवाह सोहळे पार पडले.