राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:51 AM2018-09-23T00:51:54+5:302018-09-23T01:00:56+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भुसावळातील राजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून स्तुत्य असा उपक्रम पर्यावरण संतुलासाठी राबविला
भुसावळ : शहरातील राजस्थानी समाजातर्फे सराफ बाजारातील पुरातन श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, छगनलाल बगीचा मंदिर व जुन्या बालाजी मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत करण्यात आले. यावेळी महिलांनी भजन, गाणी गाऊन पालखी काढून मूर्तीचे तापी नदीत विसर्जन केले.
या प्रसंगी मंदिराचे प्रमुख गोपाल शर्मा महाराज (चौबे), पद्माकर जोशी महाराज, बालाजी मंदिराचे बंडू महाराज, धर्मेंद्र शर्मा महाराज, पंडित श्याम चौबे, विनोद शर्मा, जे.बी.कोटेचा, राधेश्याम लाहोटी, मोहनलाल शर्मा, नमा शर्मा, सत्यनारायण शर्मा, नंदकिशोर पुरोहित, संतोष टाक, गोपाल अग्रवाल, चंद्रकांत मंत्री, गोपाल चांडक, नीलेश शर्मा, कैलास डिडवाणी, अनुप अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल, संदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, सुनील ठाकूर, सुनील झंवर, मुन्ना शर्मा, मुरलीधर अग्रवाल, प्रमोद राठी, राजेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.