राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती जोड -१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:52+5:302021-01-14T04:13:52+5:30

विद्या विकास मंदिर प्राथमिक शाळेत राजमाता जिजाउ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन ...

Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti Jod-1 | राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती जोड -१

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती जोड -१

Next

विद्या विकास मंदिर प्राथमिक शाळेत राजमाता जिजाउ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेतील उपशिक्षिका मनीषा कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

००००००००००००००००

अभिनव सराव पाठशाळा

अध्यापिका विद्यालय व अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्या एस.एम. चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका नूतन पाटील हिने स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल तर उज्ज्वल वैष्णव हिने राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे नियोजन जे.ए. भोळे यांनी केले.

०००००००००००००००००००

खुबचंद सागरमल विद्यालय

खुबचंद सागरमल विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सुरेश आदिवाल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी योगेश पवार, लक्ष्मीकांत महाजन, अजय पाटील, हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, पंकज सूर्यवंशी, संजय पाटील, मयुर पाटील, सुलेमान तडवी, नीता झोपे, उज्ज्वला गोहिल, सुनीता साळुंके उपस्थित होते.

०००००००००००००००००००००

शां.ल. खडके विद्यालय

श्रीमती शांताबाई लक्ष्मणराव खडके प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ व इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

००००००००००००००००००००००००००

ज.सु. खडके विद्यालय

ज.सु. खडके प्राथमिक विद्यामंदिरात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका आशालता वाणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शीला नारखेडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी तर संजय पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगितली.

०००००००००००००००००००

मानव सेवा विद्यालय

मानव सेवा विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका माया अंबटकर, प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील उपस्थित होत्या. प्रेरणा माकोणे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.

००००००००००००००००००

पटनी हायस्कूल, पाळधी

मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूल पाळधी येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांनी केले. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित डाक्युमेंट्री विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यावेळी शाह सईद, इक्बाल खान, नईम बिस्मिल्ला व अकील अजीज उपस्थित होते.

०००००००००००००००००००००००

केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाकडून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीपकुमार केदार व उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रासेयो एककाच्या विद्यार्थिनी शुभांगी सोनवणे, सायली पालीवाल यांचे सहकार्य लाभले.

०००००००००००००००००००००००

मुंदडे माध्यमिक विद्यालय

पिंप्राळा येथील पी.ए. मुंदडे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक विठ्ठल राजोळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षिका सुनीता पाटील यांनी दोघांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन रत्ना बागूल यांनी केले तर सुनंदा वाघमारे यांनी आभार मानले.

०००००००००००००००००००००००००

भाऊसाहेब राऊत विद्यालय

भाऊसाहेब राऊत विद्यालयात मुख्याध्यापक एल.एस. तायडे व पर्यवेक्षक एस.एम. रायसिंग यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सांस्कृतिक समिती प्रमुख तुषार भोई यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट उलगडला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti Jod-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.