राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांच्या कार्याला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:50+5:302021-01-14T04:13:50+5:30

जळगाव - शहरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार ...

Rajmata Jijau, highlight the work of Swami Vivekananda | राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांच्या कार्याला उजाळा

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांच्या कार्याला उजाळा

Next

जळगाव - शहरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

------------

सिद्धीविनायक विद्यालय

जुन्या औद्योगिक वसाहतमधील सिद्धीविनायक विद्यालयात डॉ. अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कविता शिंदे, वंदना पाटील, मुख्याध्यापक आर.पी. खोडपे, गुलाब पाटील उपस्थित होते. विद्यालयातील प्रणाली मुसळे, दिव्या निकम, काजल डांगे, प्रियंका गजरे, तेजस्विनी झांजे, देवयानी महाजन, साक्षी शिंदे या विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव आपल्या मनोगतात व्यक्त करुन उपस्थितांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. सूत्रसंचालन आर.एस. पाटील यांनी केले.

००००००००००००००००००००

मातोश्री प्राथमिक विद्यालय

प्रबोधन संस्था जळगाव, संचालित मातोश्री प्राथमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संस्थाध्यक्ष आरती बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक समाधान इंगळे व वैशाली पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी समाधान ठाकरे, शारदा मोहिते, वैशाली पाटील, कविता गावित, मिलिंद नाईक, प्रमोद झलवार आदी उपस्थित होते.

००००००००००००००००००००००००

प.न. लुंकड कन्या शाळा

प.न.लुंकड कन्या शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका साधना भालेराव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री माळी यांनी केले तर यशस्वीतेसाठी शिक्षक शिवाजी सोनवणे यांनी सहकार्य केले.

०००००००००००००००००००००००००

समर्थ विद्यालयात पुस्तक वाटप

महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वामी समर्थ विद्यालयात मुलींना जिजाऊ चरित्रावर आधारित पुस्तके वाटप करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, अशोक लाड, वाय.एस. महाजन, स्वप्नील नेमाडे, राजेश गोयर, चंद्रकांत भंगाळे, मीनाक्षी चव्हाण, उपाध्यक्ष कमल पाटील, सरचिटणीस ममता तडवी, जयश्री पाटील उपस्थित होत्या.

Web Title: Rajmata Jijau, highlight the work of Swami Vivekananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.