राजपूतांना जातीचे दाखला मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:11 PM2018-08-01T16:11:46+5:302018-08-01T16:12:46+5:30
चाळीसगाव व पारोळा येथील राष्ट्रीय करणी सेनेतर्फे नाशिक उपायुक्तांना निवेदन
पारोळा/चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत राजपूत/परदेशी भामटा या जातींचे प्रमाणपत्र मिळावे व दलालांचा बंदोबस्त करावा, अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, कुटुंबात वैधता प्रमाणपत्र असेल ते ग्राह्य धरण्यात यावे यासाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पदाधिकाºयांनी नाशिक उपायुक्त दिलीप स्वामी यांना निवेदन दिले.
महाराष्ट्रात राजपूत /परदेशी भामटा समाज राहत असून भटक्या विमुक्त जाती व जमाती अ मध्ये आरक्षणासाठी समावेश केलेला आहे. या समाजाला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक जाचक अटी व नियमांना सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेकांना आरक्षणाचा फायद्यापासून वंचित राहावे लागत आहे.
निवेदनावर पारोळा येथील राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, राष्ट्रीय संघटक व अध्यक्ष कोर कमिटी बाळासाहेब पाटील, प्रदेश प्रभारी सुभाष ठोके, राष्ट्रीय युवा सचिव महेंद्रसिंग महाले, प्रदेश महामंत्री रावसाहेब गिरासे, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपकसिंग गिरासे, जिल्हा युवाध्यक्ष गणेश सोळंके, जिल्हा युवा उपाध्यक्ष सुरेश शिंदे, जिल्हा युवा महासचिव राजेंद्र राजपूत, तालुकाध्यक्ष सचिन परदेशी, उपाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चाळीसगाव तालुका राजपूत करणी सेनेच्या वतीनेही नाशिक विभागाचे आयुक्त दिलीप स्वामी यांच्याकडे करण्यात आली. नुकतीच शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. करणी सेनेचे राष्ट्रीय पदाधिकारी आनंदसिंह ठोके, बाळासाहेब पाटील, महेंद्र महाले, सुभाष ठोके, नाना देवरे, सोनाली ठाकूर, वंदना राजपूत, सुवर्णा राजपूत, छाया राजपूुत, चंदा लुंकड, सुरेखा राजपूत, सविता खंडारे, अमोल शिरसाठ, विनोदसिंह शेखावत, नेपालसिंह नोहरा, प्रवीण शेलार, संदीप पवार, छोटू जगताप, पिंटू सावकार, दत्तू पवार, राजेंद्र पवार, सुनील जाधव, अरुण पवार, दिनेश जाधव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.