राजू बाविस्कर यांच्या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:15+5:302021-03-29T04:11:15+5:30
जळगाव : खान्देशातील चित्रकार तथा पिंप्राळा येथील पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी रेखाटलेल्या लाॅकडाऊनच्या भयावह ...
जळगाव : खान्देशातील चित्रकार तथा पिंप्राळा येथील पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी रेखाटलेल्या लाॅकडाऊनच्या भयावह स्थितीचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृतीला ऑल इंडिया बॉम्बे आर्ट सोसायटीचे ‘ललित कला अकादमी दिल्ली बेस्ट पेंटिंग’ हा महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे.
बाविस्कर यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठमोठ्या शहरातून पायी परत येणारे मजूर, त्यांचे कुटुंब, मूलबाळं, त्यांची भूकमारी ही सर्व अस्वस्थता त्यांच्या बऱ्याच चित्रांतून समोर आली. त्यातीलच पोटातली भूक, उध्वस्त झालेल्या कुटूंबप्रमुख माणसाच्या चित्राला १२९ वे ऑल इंडिया बॉम्बे आर्ट सोसायटीचे ‘ललित कला अकादमी दिल्ली बेस्ट पेंटिंग’ हा महत्वाचा पुरस्कार मिळाला. वीस हजार ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा बक्षीस समारंभ राज्यपालांच्याहस्ते होत असतो. परंतु कोविडच्या कारणाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ऑनलाईन झाला.
सध्या खान्देशात चित्रात काम करणाऱ्या चित्रकारांमध्ये प्रथमच मिळालेला हा पुरस्कार आहे. बाविस्कर यांचे हे चित्र कोविडच्या काळात हालअपेष्टा भोगणाऱ्या सामान्य माणसांचं आहे. या कोविडच्या काळाने हातावर पोटभरणाऱ्या माणसाला दारिद्र्याच्या वेदनेत खूप खोलवर लोटलं त्याची एकूणच अवस्था त्यांनी चित्रात रंग, रेषांनी स्वतंत्र चित्रशैलीने साकारली आहे.
फोटो आहे