खासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:13 PM2020-09-29T23:13:55+5:302020-09-29T23:14:09+5:30

शेतकऱ्यांची नाराजी : कांदा निर्यातबंदीसाठी पाठपुराव्याची मागणी

'Rakhrangoli' agitation of farmers at the doorstep of MPs | खासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन

खासदारांच्या दारी शेतकऱ्यांचे ‘राखरांगोळी’ आंदोलन

Next

चाळीसगाव : काद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकºयांच्या बाजूने शासन दरबारी खासदार उन्मेष पाटील यांनी आवाज उठवून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे खासदार पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेमार्फत राखरांगोळी आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आहे.
सरकारनेच केला कायदेभंग
नवीन कायद्यानुसार शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धासारखी आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही, असा कायदा असतांना केंद्र शासनाने १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालून स्वत:च कायदेभंग केला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करावा व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, भङगाव तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, सरचिटणीस देवीदास पाटील, विलास देशमुख, हेमंत चव्हाण, मनोज परदेशी, जगन्नाथ मोरे, शहराध्यक्ष भगवान चौधरी आदि संघटना पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

 

Web Title: 'Rakhrangoli' agitation of farmers at the doorstep of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.