भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंना वगळलं, स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

By Ajay.patil | Published: May 3, 2023 06:15 PM2023-05-03T18:15:41+5:302023-05-03T18:17:00+5:30

प्रदेशउपाध्यक्ष म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

Raksha Khadse was dropped from BJP's new state executive | भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंना वगळलं, स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारणीतून रक्षा खडसेंना वगळलं, स्मिता वाघ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

googlenewsNext

जळगाव - भाजपची नवीन प्रदेश कार्यकारीणीची घोषणा बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, ४७ जणांच्या कार्यकारणीतून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना वगळण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी प्रदेश चिटणीस म्हणून भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळेंची वर्णी लागली आहे. तर प्रदेशउपाध्यक्ष म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपकडून राज्याची प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. भाजपकडून ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण आता सुरु केले आहे. त्यामुळे सध्या खासदार असलेल्या रक्षा खडसे यांच्याकडून पक्ष संघटनेचे पद काढून घेण्यात आले आहे. पक्षाच्या या जंबो कार्यकारणीमध्ये जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात माजी आमदार स्मिता वाघ यांची प्रदेशउपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तर भुसावळचे माजी नगरसेवक अजय भोळे यांची चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने जिल्ह्यातून पदांची नियुक्ती करताना जातीय समीकरणं सांभाळली असून, एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर लेवा समाज पक्षापासून दुर जाण्याची शक्यता होती. त्यामुळेच अजय भोळेंची नियुक्ती करून पक्षाने लेवा समाजाला पक्षासोबत कायम ठेवण्याची रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.

महिनाअखेरपर्यंत जिल्हाध्यक्षांची होणार नियुक्ती

भाजपने प्रदेश कार्यकारीणीत बदल केल्यानंतर आता पक्षाकडून नवीन जिल्हाध्यक्षांची टीमची नियुक्ती केली जाणार असून, प्रदेशकार्यणीतील निवडीमधील  ‘एक व्यक्ती एक पद’ हेच धोरण जिल्हा कार्यकारणीत राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण व शहर असे दोन्ही जिल्हाध्यक्षांची नव्याने नियुक्ती आता महिनाअखेरपर्यंत केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, पी.सी.पाटील, अमोल शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर महाराज-जळकेकर यांची नावे आघाडीवर आहेत.

Web Title: Raksha Khadse was dropped from BJP's new state executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.