दिवसभर करता येईल आज रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:21+5:302021-08-22T04:21:21+5:30
नशिराबाद : बहीण-भावाच्या अतूट नात्याचे व प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज साजरा होत आहे. त्यास राखी पौर्णिमा असे ...
नशिराबाद : बहीण-भावाच्या अतूट नात्याचे व प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज साजरा होत आहे. त्यास राखी पौर्णिमा असे म्हटले जाते. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा अर्थात या दिवशी रक्षाबंधन सण साजरा केला जातो . बहीण भावाचे पूजन व औक्षण करून दीर्घ आयुष्याची व सुख-समृद्धीचे प्रार्थना करते तर भाऊ बहिणीच्या सुखदुःखात जीवनभर साथ देण्याची शपथ घेऊन भेटवस्तू देतो. २१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री आठ वाजेपासून पौर्णिमा प्रारंभ झाली असून आज रविवारी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत पौर्णिमा असली तरी त्यानंतरसुद्धा रक्षाबंधन साजरे करता येते. संपूर्ण दिवसभर रक्षाबंधन साजरे करता येईल. रक्षाबंधनासाठी राहू काळ अडसर ठरत नाही तसेच रक्षाबंधनासाठी विशिष्ट मुहूर्ताची गरज नाही, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’ला दिली.