संत परंपरेत रक्षाबंधन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:05+5:302021-08-23T04:19:05+5:30

तिन्ही भावांना मुक्ताईने बांधली राखी मुक्ताईनगर : संत चरित्रात बहीण व भावंडांची आपुलकी तसेच जगासाठी ज्ञान आणि मार्गदर्शनाचा ...

Rakshabandhan in the tradition of saints ..! | संत परंपरेत रक्षाबंधन..!

संत परंपरेत रक्षाबंधन..!

Next

तिन्ही भावांना मुक्ताईने बांधली राखी

मुक्ताईनगर : संत चरित्रात बहीण व भावंडांची आपुलकी तसेच जगासाठी ज्ञान आणि मार्गदर्शनाचा

अद्वितीय संगम म्हणजे संत मुक्ताई आणि भावंडांचे जीवन चरित्र.

अशात बहीण भावाच्या या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन. याच औचित्याने बहीण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माउली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्रीसंत मुक्ताबाई संस्थान कोथळी - मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील ही

रक्षाबंधनाची परंपरा अखंडपणे पार पाडली जात आहे.

राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याचा पारंपरिक उत्सव असल्याने श्री संत मुक्ताबाई

संस्थान श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर संस्थानाने आजही ही परंपरा जोपासली आहे. गेल्या कित्येक

वर्षांपासून बहीण संत मुक्ताईकडून दादा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव तिन्ही बंधूंचे गावी

मुक्ताई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी राखी पौर्णिमेच्या सणाला खास

प्रतिनिधी पाठवून कोरोना काळातसुद्धा परंपरा कायम राखली.

त्र्यंबकेश्वर येथे संदीप पाटील आणि अंकिता पाटील यांनी सपत्नीक ज्येष्ठ बंधू श्री संत निवृत्तीनाथांसाठी राखी प्रदान केली. संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांच्याकडे राखी सुपूर्द केली.

आळंदी येथे सकाळी माउली ज्ञानदादांना मुक्ताईकडील राखी तसेच रूमाल टोपी ह.भ.प. विचारसागर

महाराज लाहूडकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सोपविली.

मुक्ताईचे लहान बंधू सोपानदादांसाठी सासवड येथे जाऊन विजय महाले व ज्योती महाले यांनी मुक्ताईकडील

राखी बांधली. यावेळी पुजारी हिरूकाका गोसावी, चोपदार हरिभाऊ यांची उपस्थिती होती.

दरवर्षी रक्षाबंधनला संत मुक्ताईला मोठे बंधू संत निवृत्तीनाथ यांच्याकडून आलेली साडी नेसवली जाते. रविवारी पहाटे ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी पौरोहित्य करून मुक्ताईला हे वस्त्र परिधान केले, तर

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेली साडी दर भाऊबीजला संत मुक्ताईला नेसवली जाते. ही

परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.

फोटो २३ एचएसके ०२

त्र्यंबकेश्वर येथे संदीप पाटील यांनी सपत्नीक ज्येष्ठ बंधू श्री संत निवृत्तीनाथांसाठी राखी प्रदान केली.

Web Title: Rakshabandhan in the tradition of saints ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.