फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली : आरोग्य रक्षणासह ‘बेटी बचाओ’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:47 PM2019-09-26T12:47:59+5:302019-09-26T12:48:24+5:30

१०० जणांनी केले रक्तदान

Rally for Pharmacist Day: Message of 'Save Betty' with health care | फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली : आरोग्य रक्षणासह ‘बेटी बचाओ’चा संदेश

फार्मासिस्ट दिनानिमित्त रॅली : आरोग्य रक्षणासह ‘बेटी बचाओ’चा संदेश

Next

जळगाव : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त डिस्ट्रीक्ट मेडिसन डिलर्स असोसिएशनच्यावतीने २५ रोजी शहरात विविध कार्यक्रम होऊन रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे केमिस्ट बांधवांसह फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकांनी आरोग्य रक्षणासह बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश दिला.
रॅलीने वेधले लक्ष
सकाळी खान्देश मॉलपासून रॅली काढण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे तसेच प्राचार्य नितीन पाटील यांच्याहस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक मार्गे ही रॅली सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात (लेवा भवन) येथे पोहचली.
रॅलीमध्ये संघटनेचे सचिव अनिल झवर, प्राचार्य संजय लढे, अनुप कुलकर्णी, आर.जे. दास, जोशी, देशमुख, प्रा. बाहेती, प्रांजल घोलप यांच्यासह केमिस्ट बांधव, एमएसएमआरएचे सदस्य, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान विविध फलक हाती घेऊन विविध प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. या रॅलीले शहरवासीयांचे लक्ष वेधले.
शिबिरांना प्रतिसाद
रॅलीनंतर फार्मासिस्ट कार्यशाळा, रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, थायरॉईड तपासणी, मधुमेह तपासणी, केमिस्ट कार्यशाळा, असे विविध कार्यक्रम झाले. गोळवलकर रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबिरात १०० जणांनी रक्तदान केले. या वेळी डॉ. चैताली पवार यांनी फार्मासिस्टची शपथ दिली तर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. फार्मासिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा असून आरोग्यरक्षणाचीही त्याच्यावर जबाबदारी असल्याचे सुनील भंगाळे यांनी नमूद केले. या सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गेल्या १० वर्षांपासून फार्मासिस्ट दिनाचे यशस्वीपणे आयोजन होत असल्याबद्दल या वेळी मान्यवरांच्याहस्ते भंगाळे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले तर संघटनेचे उपाध्यक्ष ब्रजेश जैन यांनी आभार मानले.
श्यामकांत वाणी, रुपेश चौधरी, अमित चांदीवाल, राजेंद्र पाटील, दिनेश मालू, इरफान सालार, संजय तिवारी, धनंजय तळेले, अनिल कोळंबे, राजीव चौधरी, सुनील पाटील, मनीष अत्तरदे, खालीद सैयद, जयेश महाजन, दीपक चौधरी, पंकज पाटील, रवींद्र वराडे, किशोर बारी, प्रकाश चव्हाण, विलास बरडे, साहेबराव भोई, भानुदास नाईक, पद्माकर पाटील, रवी रडे, प्रवीण कोठावदे, दिनेश चौधरी, शिरीष बडगुजर, सुरेश पाटील, इलियास शेख यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारीणीच्या सदस्यंनी परिश्रम घेतले.

Web Title: Rally for Pharmacist Day: Message of 'Save Betty' with health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव