प्लॅस्टिक बंदीवर जनजागरणासाठी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:57 PM2018-08-22T16:57:18+5:302018-08-22T16:57:40+5:30

जामनेर येथे विद्यार्थिनी व महिलांचा उपक्रम

Rally for public awareness on plastic ban | प्लॅस्टिक बंदीवर जनजागरणासाठी रॅली

प्लॅस्टिक बंदीवर जनजागरणासाठी रॅली

Next







जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथे प्लॅस्टिक बंदीवर जनजागृती करण्यासाठी शहरातील दिशा फाऊंडेशनतर्फे रॅली काढण्यात आली.
पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागर या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जामनेर शहरातील मेडिकल, पंचायत समिती, तहसील कार्यालय पोलीस ठाणे या ठिकाणी रॅलीव्दारे भेटी देऊन पर्यावरण संवर्धन व जागर रॅलीचे महत्व सांगितले.
दिशा फाउंडेशन अंतर्गत नर्सिंग क्लासमधील मुला व मुलींनी टाकाऊ कागदापासून पाकिटे बनवली व शिवण कामातून शिल्लक असलेल्या कापडाच्या बॅग बनविल्या व त्या संपूर्ण बाजारात मोफत वाटप केल्या. व्यावसायिकांना त्यांना प्लॅस्टिक बंदीवर माहिती दिली. यासाठी दिशा फाऊंडेशनच्या संचालक भारती पाटील व शिवण क्लासच्या शिक्षिका प्रेरणा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Rally for public awareness on plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.