सावित्रींच्या लेकींच्या रॅलीने धरणगाव दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 05:28 PM2020-01-04T17:28:20+5:302020-01-04T17:32:40+5:30
सावित्रींच्या लेकींनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त रॅली व वैचारिक कार्यक्रम घेण्यात आला.
धरणगाव, जि.जळगाव : येथील सावित्रींच्या लेकींनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त रॅली व वैचारिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीमाईंच्या कार्याची महती वर्णन केली.
रॅलीची सुरुवात म.जोतिराव फुले यांच्या धरणी चौकातील स्मारकापासून पुष्पार्पण करून झाली. यावेळी माजी नगराध्यक्षा उषा वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, प्रा.कविता महाजन यांच्यासह प्राध्यापिका व शिक्षिका तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. रॅलीच्या सुरुवातीला म.फुले व सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषा केलेल्या वैशाली देशमुख व दीपाली नेतकर या मुली होत्या. त्यानंतर महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनी सावित्रीमाईंच्या वेशभूषेत होत्या. त्यांच्या पाठोपाठ विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. धरणी चौकातून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. रॅलीत महात्मा फुले हायस्कूल, पी.आर.हायस्कूल, अँग्लो ऊर्दू हायस्कूल, इंदिरा कन्या विद्यालय, बालकवी ठोंबरे विद्यालय, जि.प. उर्दू शाळा नं. १, नं. २ व नं. ३ या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.जे.महाजन यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.पाळधी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाविस्कर होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून मनीषा शिरसाठ होत्या. म.फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. निकिता महाजन या विद्यार्थिनीने सावित्रीमाईंचे गीत सादर केले. रुपाली पाटील हिने सावित्रीमाई डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून राजेंद्र वाघ, पी.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी यांच्यातर्फे 'सावित्रीबाईंचा जन्मोत्सव' या पुस्तिकेच्या १०० प्रती विद्यार्थिनी व शिक्षिका यांना भेट स्वरूप देण्यात आल्या.
अध्यक्षा सुलोचना बाविस्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन या देखण्या कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तुती केली. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे , माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष योगराज माळी, सचिव दशरथ माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, गटनेते कैलास माळी, विलास माळी, माजी उपनगराध्यक्ष मधुकरजी रोकडे, मुख्याध्यापक निजामोद्दीन शेख, मुख्याध्यापक शेख मुजफ्फर, मुहम्मद आरीफ, माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यू.पाटील यांच्यासह सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पाटील, विनायक महाजन ,शहराध्यक्ष राजू महाजन, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जितू महाराज, योगेश येवले, जगदीश जगताप, पंकज पाटील, शुभम बागुल, अतुल तायडे, संजय महाजन, प्रदीप माळी, कृष्णा माळी, समाधान माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन एम.के. कापडणे यांनी केले.