शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली, मात्र प्रशासनाकडे अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 10:01 AM2021-01-26T10:01:07+5:302021-01-26T10:01:32+5:30
जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात २६ जानेवारी रोजी सकाळी विविध संघटनांच्यावतीने तिरंगा रॅली ...
जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात २६ जानेवारी रोजी सकाळी विविध संघटनांच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली संदर्भात मात्र जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी कोणताही अर्ज आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ११ वाजता महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून किसान तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधान बचाव सेनेकडून सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या संदर्भातील परवानगी बाबत जिल्हा प्रशासनाकडे अर्ज आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. कोरोना काळात रॅलीला बंदी असून या रॅलीला ही परवानगी देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
किसान तिरंगा रॅली काढण्यातसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आल्याचे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे म्हणणे आहे.