जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग ‘राम भरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:18 PM2018-12-15T12:18:41+5:302018-12-15T12:18:57+5:30

सुरक्षा रक्षक नाही

Ram Bharosse, Government Medical College and Hospital, Jalgaon. | जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग ‘राम भरोसे’

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग ‘राम भरोसे’

googlenewsNext

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागासाठी वारंवार सुरक्षा रक्षकांची मागणी करूनही ते मिळत नसल्याने येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या सोबतच औषधनिर्मातादेखील मिळत नसल्याने येथे रुग्णांचे औषधीविना हाल होतात. या संदर्भात आपत्कालीन विभाग प्रमुख सुरेखा लष्करे यांनी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागात अपघात व इतर वेगवगेळ््या आजाराचे रुग्ण येतात. तसेच त्यांच्यासोबत १०० ते १५० नातेवाईक व इतर मंडळीसुद्धा असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होतो. यातून बऱ्याच वेळा वाद होतात व कधी कधी तर वैद्यकीय अधिकाºयांना मारहाण सुध्दा केली जाते. असे असतानाही येथे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिले जात नाही.
रुग्णालयात २१ सुरक्षा रक्षक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या आपत्कालीन विभागातच सुरक्षा रक्षक नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही तेथे सुरक्षा रक्षक तैनात केले जातात, असा आरोप केला जात आहे.
औषधनिर्मात्याअभावी हाल
आपत्कालीन विभागात रात्र पाळीला औषधनिर्माता नसल्याने औषध देण्यास कोणीच नसते. त्यामुळे औषध कोणी द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो. अनेक अडचणी येत असल्या तरीदेखील औषधनिर्माता नसल्याचे कारण सांगत चाल-ढकल केली जात असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
शुक्रवारीदेखील ओढावला प्रसंग
शुक्रवारी संध्याकाळीदेखील चाकू हल्ल्यातील रुग्णांना येथे आणल्यानंतर आपत्कालीन विभागात गर्दी झाली होती. त्यामुळे उपचारात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगण्यात येत होते. मात्र कोणीही बाहेर निघत नव्हते. अखरे सुरक्षा रक्षकाला बोलावून नातेवाईक व इतरांना बाहेर काढण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाºयांनी दिल्या. मात्र सुरक्षा रक्षकच नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.
आपत्कालीन विभागात सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच औषधनिर्माता नसल्यानेही अनेक अडचणी येतात. या बाबत अधिष्ठातांकडे वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नाही. - सुरेखा लष्करे, विभाग प्रमुख आपत्कालीन विभाग.

Web Title: Ram Bharosse, Government Medical College and Hospital, Jalgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव