भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी घेतला पित्याकडून वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:51 PM2018-12-17T15:51:37+5:302018-12-17T15:51:42+5:30

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे आजोबांचा राजकीय, सामाजिक व व्यवसायिक वारसा चालवत असून आजोबांनी शहराच्या विकासाचा घेतलेला ध्यास त्यांनीही सुरू ठेवला आहे.

Raman Bhole, the city president of Bhusawal, took away his father's fat | भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी घेतला पित्याकडून वसा

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी घेतला पित्याकडून वसा

Next

उत्तम काळे
भुसावळ : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे आजोबांचा राजकीय, सामाजिक व व्यवसायिक वारसा चालवत असून आजोबांनी शहराच्या विकासाचा घेतलेला ध्यास त्यांनीही सुरू ठेवला आहे.
१९६० च्या दशकात त्यांचे आजोबा कै.नामदेवराव भोळे हे नगराध्यक्ष होते. त्यांच्याच कारकीर्दीतील पिण्याच्या पाण्याच्या योजनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आजही याच योजनेतून शहराला पाणी पुरवत असल्याचे सांगण्यात येते, तर विद्यमान नगराध्यक्ष रमण भोळे यांनीही आगामी ५० वर्षांचे नियोजन करून अमृत योजना राबवत असल्याचे दिसून येत आहे.
कै.नामदेवराव भोळे यांच्या निधनानंतर कै. माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार देवीदास भोळे यांनी ३०-३५ वर्षांपासून शहर व तालुक्यात राजकीय वर्चस्व निर्माण केले होते. नगरपालिका, विधानसभा, विधानपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ, फूट सेल सोसायटी या सर्वच ठिकाणी देवीदास भोळे यांचे वर्चस्व होते. नगराध्यक्ष व आमदारकी एकाच वेळेस उपभोगणारे भोळे हे शहरात एकमेव व्यक्ती होते.
भोळे यांनी विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य ही दोन्ही आमदारकीची पदे उपभोगली आहेत.
दोन्ही सभागृहांचे सदस्य होणारे ते शहर व तालुक्यातील एकमेव व्यक्ती होते, तर सर्वच सहकारी संस्थांवर ते सभापती राहिले असून, एक हाती सत्ता आणण्याची त्यांच्यात क्षमता होती, तर पीपल्स बँकेचे ते संस्थापक होते.

देवीदास भोळे यांचा वारसा पुढे त्यांचे पूत्रनगराध्यक्ष रमण भोळे हे सांभाळत आहेत. १९९१ साली नगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून निवडून आले व रमण भोळे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरही ते नगरपालिकेत सदस्य म्हणून निवडून आले होते. २०१६-१७ साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले व त्यांनी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भविष्याचा वेध घेऊन अमृत योजना राबवत आहे.
भुसावळ शहराचा दीर्घकाळापासून थांबलेला विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न सुरू केले आहे. त्यामध्ये नागरी सुविधा, रस्ते, दिवे, गटारी, जल व मलनिस्सारण आदी प्रश्न त्यांनी हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे शहरात दैना झालेल्या उद्यानांची सुधारणा करण्याची कामे हाती घेतली आहेत. नगरपालिका दवाखान्याचे नूतनीकरण करणे, आरोग्यसेवेची उपलब्ध असलेल्या प्रश्नांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.
राजकीय वारशासोबतच त्यांनी वडिलांचा परंपरागत व्यवसाय सांभाळला आहे. त्यांचा वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय असून शेतीला निगडीत कपाशीचा व्यापार, कापड दुकान, सरकी हे परंपरागत व्यवसाय त्यांनी सांभाळले आहेत.

Web Title: Raman Bhole, the city president of Bhusawal, took away his father's fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.