पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:18 PM2019-10-12T17:18:45+5:302019-10-12T17:21:51+5:30

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव १३ रोजी होत आहे.

Rambhai Devi Yatrootsav today at Samir in Panchora taluka | पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देबोकड बळीची प्रथा बंददुपारी तगतरावची मिरवणूक रात्री लोकनाट्य तमाशा

राजेंद्र साळुंखे
सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव १३ रोजी होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने नवस फेडण्यासाठी येतात.
आख्यायिका
रंभाई या सामनेर येथील चव्हाण कुळातील सून होत्या. त्यांचे माहेर हे नांद खुर्द, ता.एरंडोल येथील होते. त्या पवार घराण्यातील कन्या होत्या. भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून रंभाई देवीची ख्याती आहे.
बोकड बळीची प्रथा बंद
रंभाई देवीला यात्रोत्सवानिमित्ताने बोकळ बळीची प्रथा सुरू होती. मात्र ग्रामस्थांनी बोकड बळीऐवजी मिष्टान्न नैवेद्य देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पूर्णपणे बोकळ बळीची प्रथा बंद करण्यात आली. चव्हाण परिवारात परंपरागत पद्धतीने भाऊबंदकीतील एक एक याप्रमाणे यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षीचे यात्रोत्सवाचे मानकरी रामकृष्ण चव्हाण, हिलाल चव्हाण, प्रदीप चव्हाण हे आहेत.
दुपारी तगतरावची मिरवणूक निघेल. रात्री लोकनाट्य तमाशा होईल. याआधी यात्रेत विविध खाद्यपदार्थ, खेळणी, पाळणे, संसारोपयोगी साहित्य आदी दुकाने थाटली आहेत. यात्रोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण परिवार व ग्रामस्थांनी केले आहे

 

Web Title: Rambhai Devi Yatrootsav today at Samir in Panchora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.