दोन शिवलिंग असलेले रामेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:12 PM2018-09-03T15:12:55+5:302018-09-03T15:15:27+5:30

तापी, गिरणा व अंजनी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या रामेश्वर येथे श्रावण मासानिमित्त शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण सोमवारी येथे यात्रा भरते.

Rameshwar Temple with two Shivling | दोन शिवलिंग असलेले रामेश्वर मंदिर

दोन शिवलिंग असलेले रामेश्वर मंदिर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभू श्रीराम व लक्ष्मण वनवासादरम्यान येथे मुक्कामी थांबल्याची अख्याईकाखोदकामा दरम्यान निघते रामरक्षाराजा दशरथाचा दशकिक्रया विधी रामेश्वर येथे झाल्याची अख्याईका

राजेंद्र पाटील ।
गाढोदा, ता़ जळगाव : येथून जवळच असलेल्या तापी, गिरणा व अंजनी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या रामेश्वर येथे श्रावण मासानिमित्त शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण सोमवारी येथे यात्रा भरते.
प्रभू श्रीरामचंद्र व लक्ष्मण वनवासादरम्यान येथे मुक्कामी थांबले होते. त्यांनी याठिकाणी वेगवेगळे दोन शिवलिंग स्थापन केलेले आहेत. पवित्र अशा या तपोभूमीत विश्वमित्र या ऋषीने रामरक्षा यज्ञ याच मंदिराशेजारी केलेला होता. आज सुद्धा खोदकाम केले असता त्या जमिनीतून रामरक्षा निघते. राजा दशरथाचा दशक्रिया विधी याच ठिकाणी झाल्याचा तापीपुराण या ग्रंथात उल्लेख आहे.
तीन नद्यांचा हा त्रिवेणी संगम ओम आकाराचा आहे. ॐ ओम आकाराच्या या तीनही नद्यांचा आकार व ओमवरील चंद्रावरच्या अनुस्वादाच्या जागी हे मंदिर आहे.
इ.स. १२०० मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. दक्षिण भारतानंतर दोन शिवलिंग एकाच ठिकाणी स्थापलेले हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.
गेल्या १५ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थेट मंदिरापर्यंत वाहने जातील असा रस्ता तयार करण्यात आलेला होता. मात्र आज तो रस्ता अतिशय खराब असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. एस.टी. महामंडळाच्या बसेस तर इथे येतच नसल्याने ३ ते ४ कि.मी. अंतराची पायपीट करून भाविकांना ऐतिहासिक अशा या महादेवाचे दर्शन घ्यावे लागते.

Web Title: Rameshwar Temple with two Shivling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव