केकतनिंभोरा येथील रामराज्य ग्रुपने दिला गावाच्या विकासाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:32 PM2018-09-19T16:32:08+5:302018-09-19T16:32:54+5:30

The Ramrajya group of Kekantnibhora gave the help of the village | केकतनिंभोरा येथील रामराज्य ग्रुपने दिला गावाच्या विकासाला साथ

केकतनिंभोरा येथील रामराज्य ग्रुपने दिला गावाच्या विकासाला साथ

Next
ठळक मुद्देगणेश उत्सवात खर्च न करता बसविणार सी.सी.टी.व्ही.कॅमेरेतसेच गावात सुरू करणार सार्वजनिक वाचनालयतरुणांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी केले स्वागत

पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर, जि.जळगाव : गणेश उत्सव म्हटला की, जिकडे तिकडे विजेच्या लखलखाटासह आकर्षक रोषणाई, बॅण्ड, डीजेचा कर्कश आवाज, अनाठाई खर्च पाहावयास मिळतो, परंतु या सर्व गोष्टीना आळा घालत केकतनिंभोरा (ता.जामनेर) येथील रामराज्य ग्रुप बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने गावाच्या सुरक्षेसाठी गावातील मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
आजूबाजूच्या परिसरातील चालू घडामोडीची गावातील नागरिकांना माहिती होऊन तरूणाना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गावात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाला साथच देणार आहे. सी.सी.टी.व्ही.कॅमेरे व सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते २१ रोजी करण्यात येणार आहे.
या वेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा केशव पातोंड, तहसीलदार नामदेव टिळेकर, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, जि.प.सदस्या विद्या खोडपे, माजी पं.स.सभापती संगीता पिठोडे, पं.स.गटनेता अमर पाटील, न.पा.गटनेता डॉ.प्रशांत भोंडे, शेतकरी संघाचे व्हाईस चेअरमन बाबूराव गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम, पोलीस पाटील गोरख बहिरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे आयोजक रामराज्य ग्रुप बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.




 

Web Title: The Ramrajya group of Kekantnibhora gave the help of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.