नयना महाजन यांना रणरागिणी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:14+5:302021-06-20T04:13:14+5:30
जळगाव : येथील डॉ. नयना नितीन महाजन यांना केंद्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे खान्देश रणरागिणी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्या ...
जळगाव : येथील डॉ. नयना नितीन महाजन यांना केंद्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे खान्देश रणरागिणी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्या डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला संगीता छायागुडे, डॉ. मिलिंद दहिवले, डॉ. शिवचरण उज्जैनकर, संजय भटकर, डॉ. अजय पाटील, राजकुमार कांकरिया उपस्थित होते.
क्रीडा गुणांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खेळाडूंना क्रीडा गुण दिले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी आपापल्या खेळाडूंचे प्रस्ताव २१ जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २१ जूनपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांनी क्रीडा गुणांचे प्रस्ताव सादर करावे तर २५ जूनच्या आधी हे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर करायचे आहेत.