पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:35 PM2019-02-04T16:35:30+5:302019-02-04T16:38:27+5:30
रानडुकराने केलेल्या हल्ल्यात बापूराव सर्जेराव पवार (५०) हे शेतकरी जखमी झाल्याची घटना सातगाव डोंगरी येथे ३ रोजी घडली.
सातगाव डोंगरी, ता.पाचोरा, जि.जळगाव : रानडुकराने केलेल्या हल्ल्यात बापूराव सर्जेराव पवार (५०) हे शेतकरी जखमी झाल्याची घटना सातगाव डोंगरी येथे ३ रोजी घडली. या घटनेत शेतकºयाने समयसूचकता दाखविल्याने बालंबाल बचावले.
शेतकरी बापूराव पवार हे सातगाव शिवारातील स्वत:च्या शेतामध्ये दुपारच्या दीड वाजेच्या दरम्यान एकटेच काम करीत होते. तेव्हा शेजारील दादरच्या (ज्वारी) शेतातून रानडुकराने पवार यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांच्या मांडीला रानडुकराने चावा घेतला. एकामागून एक अशा तीन ठोसा रानडुकराने मारल्या. चौथी ठोस मारण्याच्या प्रयत्नात असताना, पवार यांनी समयसुचकतेने शिवाय त्यांची उंची चांगली असल्याने एक पाय वर केला. त्यावेळी जोरात आलेले रानडुक्कर त्यांच्या पायाखालून निघून गेले. ते परत शेतकºयाकडे आले नाही. त्यामुळे ते बालंबाल वाचले. रानडुक्कर निघून गेल्यावर पवार यांनी आरडाओरडा केली. तेव्हा आजूबाजूचे शेतकरी धावत आले. सुरुवातीला त्यांना पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे संबंधित इंजेक्शन नसल्याने जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून उपचार घेऊन, त्यांना पाचोरा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सदर घटना वनपाल एस.टी. भिलावे यांना कळविण्यात आली. भिलावे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जखमी शेतकºयाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
परिसरातील शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, अशी बरीच रानडुकरे जंगलात असून, झाडाझुडपांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. सदर परिसर अजिंठा पर्वताच्या जवळच असल्याने, शिवाय डोंगरात पाणी नसल्याने, ज्या ठिकाणी शेतकºयांनी स्वत:च्या गुरांसाठी सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी ठेवलेले आहे. हेच पाणी पिण्यासाठी डोंगरातून ही रानडुकरे व इतर प्राणी येत असतात. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने अशा प्राण्यांच्या भीतीपासून शेतकºयांचे संरक्षण करावे, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.