जळगावात कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:51 PM2018-11-22T12:51:57+5:302018-11-22T12:52:58+5:30
मुहूर्तावर अभिषेक
जळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील कार्तिक स्वामींच्या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली़ मुहूर्तावर अभिषेक, पूजा विधी संपन्न व्हावे, यासाठी गुरुवारी भाविकांनी विशेषत: महिलांनी निवृत्तीनगरातील मंदिरात प्रचंड गर्दी केली होती़ एमआयडीसी परिसरातील शिवपंचायत मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले़
निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टतर्फे स्थापना करण्यात आलेल्या कार्तिक स्वामी मंदिरामध्ये सकाळी ११ वाजता ३३ वस्तूंव्दारे कार्तिक स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर व दुसऱ्या दिवशी २३ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे. औद्योगिक वसाहत येथील जे - ३२ परिसरातील श्री विश्वनाथ मंदिरात पूजा विधी, आरती तसेच महाप्रसादचा कार्यक्रम झाला़ एम़आय़डी़सी मध्ये ई - ८ सेक्टरमधील शिवपंचायत मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सवात २२ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ते २३ रोजी संध्याकाळपर्यंत अभिषेक, आरती असे विविध कार्यक्रम होणार आहे.