चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 04:54 PM2019-10-25T16:54:31+5:302019-10-25T16:55:27+5:30

लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली.

Rangali Shasuras hosted by 'Diwali Pahat' event in Chalisgaon | चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

Next
ठळक मुद्देकौटुंबिकतेकडून सांस्कृतिकतेकडे नेणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसादलाडशाखीय वाणी समाजातर्फे उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बागड (मालेगाव) प्रमुख अतिथी होते, तर व्यासपीठावर स्रीरोगतज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रवीण भोकरे, डॉ.महेश वाणी, रवींद्र शिरुडे, नीलेश सोनगिरे, संस्थापक वसंत वाणी, अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव विजय भामरे आदी उपस्थित होते.
दिवाळी सण म्हटला की, सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. याव्यतिरिक्त ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सवार्ना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत,विद्या भोई,गायत्री चौधरी,पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.'माझे माहेर पंढरी', 'अबीर गुलाल उधळीत रंग', 'आळंदी वंदीन', 'विघ्नेश्वर तू वरदविनायका' यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी झाली. बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भक्तीमय गीताने सर्वांना आनंददायी मेजवानी दिली. यावेळी उपस्थितांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली.
आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण उत्सववादी योजना आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक म्हणजे दिवाळी असून दिवाळीतील फराळ हा आहार परंपरेचा परिपाक आहे. याचा संबंध खाद्य संस्कृतीशीही असून मात्र खाण्यापिण्याची चंगळ सांभाळायला हवी. वातावरणाला अनुरुप व बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाºया विकृतींना प्रतिबंधक काळजी घ्यायला हवी, असे डॉ.विनोद कोतकर यांनी मार्गदर्शनपर सांगितले तर डॉ.प्रवीण भोकरे यांनी थंडीतले निरोगी वातावरण, त्यात मुबलक धनधान्यातून बलवर्धन करणाºया आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला असून हे स्वाभाविक गुण सर्वांनी अवलंबायला हवे असल्याचे सांगितले.
शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार प्रत्येकाने करायला हवा.समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह,हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारामागेदेखील दिवाळीतील फराळांमधील साखर व मैदा हे प्रमुख कारण राहिले आहे. आहारात याची प्रमाणशीर काळजी घ्यायला हवी, असे डॉ.भाग्यश्री शिनकर यांनी सांगितले.
सूत्रसंचालन कैलास पाखले यांनी, तर आभार प्रा.बी.आर.येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगिरे, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, जयवंत कोतकर, सतीश देव, मनोज शिरुडे, रवींद्र अमृतकर ,बी.के.वाणी, रवी अमृतकर, केशव गोल्हार, अशोक गोल्हार, दिलीप येवले, प्रकाश अमृतकर, हरिचंन्द्र पिंगळे, श्रीधर फुलदेवरे, गजानन कोतकर, प्रशांत बागड आदीनी परिश्रम घेतले.

Web Title: Rangali Shasuras hosted by 'Diwali Pahat' event in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.