पारोळा येथे रंगला भक्तीगीतांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:51 PM2020-01-04T15:51:05+5:302020-01-04T15:52:19+5:30

बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला.

Rangla Devotional Song Program in Parola | पारोळा येथे रंगला भक्तीगीतांचा कार्यक्रम

पारोळा येथे रंगला भक्तीगीतांचा कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देपारोळा बालाजी मंदिरात भक्तीगीतांनी केले नववर्षाचे स्वागतभक्तीसंगीताच्या कार्यक्रमाने शहरवासीयांनी दिली दाद

पारोळा, जि.जळगाव : येथील बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला.
रात्री ८ वाजता बालाजी मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या वेळी बालाजी, श्रीराम यांच्यावर विविध प्रकारची सुमधुर गाणी सादर केली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या भक्तीसंगीतातून उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाल.
कृतीका शिंपी हिने सादर केलेल्या अंबेच्या जोगव्यातून उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फिटले. श्री बालाजी महाराज तिरुपती येथून भक्त गिरीशेठ शिंपी यांच्यासोबत पारोळ्यात कसे आले हे निवेदकातून संजय पिले यांनी सांगितले.
रात्री १२ वाजता श्री बालाजी महाराज यांची शेष आरती झाली आणि नववर्षाचे स्वागतही जल्लोषात करण्यात आले. उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले.
आराधना ग्रुपचे संजय क्षीरसागर, राजू क्षीरसागर , वीरेंद्र क्षीरसागर, लक्ष्मण राजपूत, कृष्णा सोनवणे, पवन झंवर, जया साळुंखे, जयेश साळुंखे, भास्कर साळुंखे, संजय पिले यांनी गाणी सादर केली.

Web Title: Rangla Devotional Song Program in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.