तापी-पूर्णा संगमावर रंगला गुरू- शिष्य भेटी निमित्तचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 09:56 PM2020-02-21T21:56:11+5:302020-02-21T21:56:16+5:30

भाविकांची गर्दी उसळली

Rangla Guru - Disciples Meeting Ceremony at Tapi-Purna Sangam | तापी-पूर्णा संगमावर रंगला गुरू- शिष्य भेटी निमित्तचा सोहळा

तापी-पूर्णा संगमावर रंगला गुरू- शिष्य भेटी निमित्तचा सोहळा

Next

मुक्ताईनगर : चौदाशे वर्षाचे शिष्य व चौदा वर्षे वयाचे गुरू अशा अनोख्या चांगदेव- मुक्ताबाई गुरूशिष्य जोडीच्या भेटीच्या पर्वावर शुक्रवारी तापी तिरावरील हा भेटीनिमित्तचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवत कृतकृत्य झालेले वारकरी हे दिड्या व पालख्यासह शनिवारी निरोप घेत माघारी परतणार आहेत.
संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून योगिराज चांगदेव महाराज भेटीसाठी हजारो वारकरी भाविकांसह पादूका पालखी पूजन करून मार्गस्थ झालेले व ११ वाजता तापी-पूर्णा संगमावरील योगिराज चांगदेव महाराज मंदिरात पोहचले. यावेळी वारकरी तसेच भाविकांनी चांगदेव-मुक्ताबाई गजर केला. मुक्ताबाई पादूका चांगदेव महाराज मंदिरात नेवून पूजन करण्यात आले.
शाल श्रीफळ देवून शिष्यांचा गौरव करण्यात आला. संत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी मानकरी यांचा सन्मान केला. पंकज महाराज पाटील उपस्थित होते.
हा सोहळा डोळ्यात साठवण्याची भाविकांची गर्दी उसळली होती. मुक्ताई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मंदिरात प्रचंड गर्दी जाणवली. तत्पूर्वी प्राचीन समाधीस्थळ कोथळी येथे उपसरपंच उमेश राणे यांनी सपत्निक महापूजा अभिषेक व साडीचोळी अर्पण केली.
दिवसभर मंदिरात शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण चालू होते. रात्री सद्गगुरू भोजने महाराज दिंडी अटाळी खामगाव फडाची कीर्तन सेवा झाली.
काल्याचे कीर्तनाने
होणार यात्रोत्सवाची सांगता
शनिवार सकाळी १० वा सद्गगुरू सखाराम महाराज वंशज हभप विश्वंभर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने मुक्ताई व चांगदेव महाशिवरात्री यात्रौत्सवाची सांगता होईल.

Web Title: Rangla Guru - Disciples Meeting Ceremony at Tapi-Purna Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.