पडीत जमिनीतून रांजणगाव ग्रा. पं.ला उत्पन्न

By Admin | Published: June 17, 2017 01:35 PM2017-06-17T13:35:32+5:302017-06-17T13:35:32+5:30

जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे

Ranjangaon gram P. generated | पडीत जमिनीतून रांजणगाव ग्रा. पं.ला उत्पन्न

पडीत जमिनीतून रांजणगाव ग्रा. पं.ला उत्पन्न

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत / काकाजी शिंदे 


रांजणगाव, जि. जळगाव, दि. 17 -   चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीने पडीत जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे. पदाधिका:यांच्या या आगळ्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतींनीही हा धडा घेण्यासारखा असल्याचा सूर उमटत आहे.
रांजगणगाव लगत असलेली ग्रामपंचायतीच्या  मालकीची  6 एकर ुपडीत जमीन 1 जून रोजी रब्बी हंगामासाठी भाडेतत्वावर लिलावात काढण्यात आली. 10 हजारापासून बोलीला सुरुवात झाली. यावेळी धनराज सूर्यवंशी, ईश्वर साठे, घनशाम चौधरी, विकास चव्हाण, राजू ंिशंपी,  आबा पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांनी बोली लावली. अखेरीस  विकास चव्हाण यांनी 74 हजार रुपयाची सर्वाधिक बोली लावली.  यामुळे 1 जून 17 ते 31 मार्च 18 र्पयत  या जमिनीचा ताबा त्यांच्याकडे राहणार असून हंगामी पीक घेतले जाणार आहे.  गत 30 वर्षापासून ही जमीन पडून होती.  हीे जमीन पिकासाठी लिलावाद्वारे देण्याची सूचना जिभाऊ पाटील यांनी मांडली होती. त्यास ग्रा.पं. सदस्य प्रमोद चव्हाण, संतोष सूर्यवंशी, उपसरपंच अमजद पठाण,  देविदास मोरे, शेखर निंबाळकर, अलीम शेख यांनीही सहमती दिली.  ग्रा.पं.ने ही जमीन जेसीबी मशीनने साफ करुन दिली. आहे. यामुळे ग्रा.पं.च्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. या जमिनीवर ग्रामस्थांनी अतिक्रमणारस सुरुवात  केली होती. ही जमीन दोन  कोटी रुपये किमतीची असून तिचा उपयोग आता पिकासाठी होणार आहे असे ग्रामविकास अधिकारी जयवंत येवले यांनी सांगितले.

Web Title: Ranjangaon gram P. generated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.