माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांविरुध्द खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:54 PM2020-06-20T18:54:17+5:302020-06-20T18:54:27+5:30
वाळू व्यावसायिकाची तक्रार : दरमहा हप्तयाची मागणी
जळगाव : वाळू व्यवसायाविरुध्द आवाज न उठविण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (रा.शिवाजी नगर) यांच्याविरुध्द शहर पोलिसात शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू व्यावसायिक विठ्ठल भागवत पाटील (३२,रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार,विठ्ठल पाटील यांनी म्हटले आहे की, आपण वाळूचा व्यवसाय करीत असून त्यासाठी नियमानुसार शासकीय चलन भरतो. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात वाळू वाहतूकीचे सर्व व्यवसाय बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आपण शासनाची फी न भरता वाळू व्यवसाय करतात, त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. तुमची व अधिकाऱ्यांची मी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो. माहिती अधिकारात तुमची माहिती काढतो. मला तुम्ही हप्ते द्या, नाही तर तुमच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करेल तर अधिकाºयांविरुध्द तक्रारी करेल असे म्हणत धमकावले.
दोन टप्प्यात घेतली खंडणी
गुप्ता व अनिस पांडे यांनी २० एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलावून घेतले. गुप्ता म्हणाले की, मी तुला सांगितले होते की, तुझ्या व सोबत असलेल्या लोकांच्या व्यवसायाबाबत सांगितले होते, माझे काम केले नाही असे बोलून सागर पार्कजवळील पेट्रोल पंपाजवळ विठ्ठल पाटील आणि बाळू नामदेव चाटे असे गेले असता, गुप्ता यांनी शिवीगाळ व दादागीरी करून तुम्हाला जळगावात राहू देणार नाही, तुमच्या विरूध्द महितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये टाकेलह्ण असा दम दिला. त्यावेळी आपण बाळू चाटे यांच्यासमोर दिड लाख रुपये रोख दिले. त्यावर गुप्ता म्हणाले की, मला दर महिन्याला हप्ता तुम्ही लोकांनी द्यायचा आहे. पुन्हा मे महिन्यात मनपाजवळी खाऊ गल्ली येवून पुन्हा पैशांची मागणी केली त्यावेळी राहूल ठाकरे यांच्या समोर वीस हजार रुपये दिले. त्यानंतर १६ जून रोजी पुन्हा पैशांची मागणी केली. १९ जून रोजी गुप्ता यांचा सहकारी अनिस पांडे यांने सकाळी १० वाजता कोर्ट चौकात बोलावून गुप्ता व तुमचा वाद मिटवतो असे सांगितले. मात्र वाद मिटलाच नाही. शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अधिका-यांच्या सांगण्यावरुन ही खोटी तक्रार देण्यात आली आहे. चार जण जेव्हा मला भेटले, तेव्हा त्यातीलच एक जण आपण निष्पाप आहात असे म्हणतोय. त्याचे चित्रण सर्वत्र व्हायरल झाले. मी तक्रार दिल्यामुळेच त्यांनी ही तक्रार दिली आहे. खंडणी घेतल्याचे सिध्द करावे.
-दीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते.