नाशिकच्या महिला वकीलासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 10:59 PM2021-11-17T22:59:38+5:302021-11-17T23:00:22+5:30

मुलीची बदनामी व अट्रोसिटीच्या गुन्ह्याची धमकी देऊन २० लाख रुपये मागितले

Ransom case filed against three persons including a woman lawyer from Nashik | नाशिकच्या महिला वकीलासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिकच्या महिला वकीलासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Next


अमळनेर : तरुणीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकून अब्रूचे खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून २० लाख रुपये मागणाऱ्या नाशिक च्या महिला वकीलासह तिघांवर मारवड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथील संदीप सदाशिव पाटील यांची भाची शिरसाळे येथील सतीश उर्फ सागर लक्ष्मण कोळी याने फुस लावून पळवून नेले होते.त्यावेळी सागर ने त्या मुलीसोबत फोटो काढून ठेवले होते. त्या संधीचा गैरफायदा घेत सतीश उर्फ सागर याने तरवाडे गावातील शरद उखा पाटील(पवार) व नाशिक येथील वकील ऍड अलका शेळके मोरे पाटील यांच्याशी संगनमत करून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करु नये म्हणून ते २० लाख रुपये मागणी करीत आहेत त्या मोबदल्यात अब्रूस नुकसान पोहचविणार नाही असे लोकांकडून कळल्यावर संदीप पाटील यांनी पाच लाख रुपये घेऊन टाका असे सांगितले असता शरद पाटील याने ऍड अलका मोरे यांच्याशी चर्चा करायला सांगितली.२५ ऑक्टोबर रोजी संदीप हा अमळनेर बाजार समितीच्या आवारात असताना शरद ,ऍड अलका व सतीश उर्फ सागर तिघे येऊन २०लाख रुपयांची खंडणी मागू लागले. देण्यास नकार दिला असता तिघांनी शिवीगाळ मारहाण करून शर्ट फाडले आणि तुला जगणे मुश्किल करून टाकू अशी धमकी दिली. संदीप तेथून तरवाडे येथे आल्यावर ते तिघे आधीच तेथे पोहचले होते. त्यांनी संदीपला थांबवून पुन्हा २०लाखाची मागणी केली व सतीश अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार नाही तुझ्या भाचीला कुठेच अडथळा आणणार नाही असे सांगून न दिल्यास तुला किंवा तुझ्या परिवारातील कोणालाही मारून टाकू तुला धारदार शस्रने गंभीर दुखापत करू अशी धमकी दिल्याने संदीपने मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध खंडणी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.

Web Title: Ransom case filed against three persons including a woman lawyer from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.