तरुणीला डांबून ठेवून उकळली दीड लाखाची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:05 PM2020-06-20T19:05:19+5:302020-06-20T19:05:31+5:30

दोन महिलांविरुध्द गुन्हा दाखल : प्रेयसी व प्रियकराच्या वडीलांना धमक्या

A ransom of Rs | तरुणीला डांबून ठेवून उकळली दीड लाखाची खंडणी

तरुणीला डांबून ठेवून उकळली दीड लाखाची खंडणी

Next


जळगाव: प्रेयसी व प्रियकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांच्या पालकांकडून १ लाख ५५ हजाराची खंडणी उकळल्याप्रकरणी वंदना भगवान पाटील (रा.राजपूत कॉलनी, हरिविठ्ठल नगर) व रेखा सुभाष पाटील (रा.आरएमएस कॉलनी) या तथाकथिक महिला समाजसेविकांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेत या समाजसेविकेंनी प्रेयसीला तब्बल दहा दिवस घरात डांबून ठेवले होते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १९ वर्षीय तरुणीचे सोबतच शिक्षण घेत असलेल्या तरुणाशी प्रेमप्रकरण सुरु होते. काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्याने      प्रियकराने पे्रयसीशी बोलणे बंद केले. तिच्या फोनलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे तरुणीने १५ मे रोजी समाजसेविका रेखा पाटील व वंदना पाटील यांच्याकडे जाऊन प्रेमप्रकरणाची माहिती दिली.त्यानंतर १६ मे रोजी तरुणी रेखा पाटील यांच्या घरी गेली असता या दोन्ही महिलांनी तरुणीची एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली.त्यानंतर तिघे जण रामानंद पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज दिला. या ठिकाणी प्रियकर व त्याच्या वडिलांना बोलवून वाद मिटविण्यात आला.
त्यानंतर रेखा पाटील यांनी तुझा प्रियकर तुझ्याशी लग्न करण्यास नाही म्हणतो,त्याला आम्ही पाहतो,असे तरुणीला सांगून महीलानी तिला सोबत त्यांच्या घरी नेले. या कामासाठी आम्ही शुल्क घेतो असे सांगून तरुणीकडे ५५ हजार रुपयांची मागणी केली. प्रकरण संवेदनशील असल्याने तरुणीने हा विषय वडीलांना सांगितला. त्यानंतर वडीलांनी दुसºया दिवशी ५५ हजार रुपये वंदना व रेखा पाटील यांना रेखा पाटील हिच्या घरी दिले.दरम्यान, २६ मे पर्यंत तरुणीला रेखा पाटील हिने स्वत:च्या घरातच डांबून ठेवले. या काळात त्यांनी तरुणीचा कोणाशीही संपर्क होऊ दिला नाही. उलट दम भरण्याचे काम केले. 
प्रियकराच्या वडीलांकडून घेतले १ लाख
तरुणीने २६ रोजी रेखा पाटील हिची नजर चुकवून घर गाठले. प्रियकर व प्रेयसी दोघांमधील वाद न मिटल्याने प्रेयसीने गैरसमज दूर करण्यासाठी प्रियकराच्या वडीलांची भेट घेतली असता रेखा व वंदना पाटील यांनी प्रियकराच्या वडीलांना गाठून २ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली व त्यातील १ लाख रुपये घेतले देखील. उर्वरित १ लाख ७० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले असे समजले. प्रियकर व प्रेयसीच्या भांडणाचा गैरफायदा घेत दोघांच्या पालकांकडून समाजसेविकांनी १ लाख ५५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचे बिंग फुटले. त्यामुळे प्रेयसीने शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून खंडणीची तक्रार दिली. त्यावरुन तथाकथित समाजसेविकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A ransom of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.