जळगाव समाज कल्याण सहायक आयुक्ताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 04:53 PM2019-06-24T16:53:54+5:302019-06-24T16:56:51+5:30
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा.चाळीसगाव) याच्याविरुध्द सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तरुणीला मारहाण करुन घराबाहेर हाकलून लावणारी योगेशची पत्नी व वडील सुभाषराव पाटील यांच्याही विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा.चाळीसगाव) याच्याविरुध्द सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तरुणीला मारहाण करुन घराबाहेर हाकलून लावणारी योगेशची पत्नी व वडील सुभाषराव पाटील यांच्याही विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी समाजकल्याण विभागातंर्गत चालविण्यात येणाºया एका संस्थेत कंत्राटी पध्दतीने नोकरी करीत आहेत.
कामानिमित्ताने योगेश पाटील याच्याशी तिचा संपर्क आला. त्यानंतर व्हॉटस्अॅपवर चॅटींग तसेच घरी जेवणासाठी येणे-जाणे वाढले. दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरल्याने योगेश याने पीडित तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याच्या गणपती नगरात डिसेंबर २०१८ पासून सातत्याने बलात्कार केला.
आजार निष्पन्न होताच नकार
पीडित तरुणी आजारी राहत असल्याने १५ मे २०१९ रोजी नाशिक येथील एका दवाखान्यात तपासणी केली असता ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले. या आजाराबाबत योगेश पाटील याला सांगितले असता आता तु माझ्या कामाची नाही असे सांगून संपर्क तोडला. त्याच्या घरी गेले असता त्याने घरातून हाकलून लावले.
पत्नी व वडीलांनी दिले पैशाचे आमिष
योगेश पाटील याचे लग्न झालेले आहे. पत्नी असतानाही मी तुला नांदवेल, पत्नीची मी समजूत काढेल असे सांगितले होते,मात्र लग्नास नकार दिल्याने पीडिता त्याच्या घरी गेले असता पत्नी सीमा यांनी दोघांमधील संबंधाची माहिती घेतली. त्यांना मोबाईलमधील स्क्रीन शॉर्टचे पुरावे दाखविले असता हे प्रकरण बंद करण्यासाठी काय करावे लागेल. तुला पैसे देते पण हे प्रकरण बंद कर असे सांगितले. त्यानंतर त्याच्या वडीलांनीही शनिवारी मू.जे.महाविद्यालयाच्या परिसरात बोलावले व माझ्या मुलाला वाचव,हवे तेवढे पैसे घे म्हणून विनंती केली, मात्र मी लग्नावर ठाम असल्याने पीडितेने तक्रार दिली.