अमरावती येथील विद्यार्थिनीवर जळगावातील वसतीगृहात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:29 PM2017-12-20T13:29:27+5:302017-12-20T13:31:12+5:30

तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

A rape in a resident in Jalgaon | अमरावती येथील विद्यार्थिनीवर जळगावातील वसतीगृहात बलात्कार

अमरावती येथील विद्यार्थिनीवर जळगावातील वसतीगृहात बलात्कार

Next
ठळक मुद्देतोंड दाबून अत्याचार पीडितेची वैद्यकिय तपासणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय विद्यार्थिनीवर वाघ नगरातील एका वसतीगृहात बलात्कार केल्याप्रकरणी अविनाश अशोक पाटील (रा.वरखेड खुर्द, ता. बोदवड) या तरुणाविरुध्द मंगळवारी सायंकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लगAाचे आमिष दाखवून अविनाश याने जबरदस्तीने बलात्कार केल्याचे पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे.
वरखेड येथील तरुणाविद्ध गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश पाटील (रा.वरखेड) व पीडित तरुणी हे दोघं नातेवाईक आहेत. वाघ नगरातील श्रीधर बोरोले वसतीगृहातील खोली क्र.1 मध्ये 11 ऑक्टोबर सकाळी 11 ते 12 ऑक्टोबरच्या पहाटे पाच या वेळेत अविनाश याने पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ‘मला तुङयाशी लगA करायचे आहे’ असे सांगून त्याने जबरदस्ती करण्याचा प्रय} केला. त्याला प्रतिकार करुन आरडाओरड केली असता अविनाश याने तोंड दाबून अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केली तर आई, वडीलांनाही ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. दरम्यान, पीडित तरुणीने मंगळवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली. त्यानंतर सायंकाळी पीडितेची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. संशयित आरोपी फरार असल्याचे तपासाधिकारी राजूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितल़े

Web Title: A rape in a resident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.