जळगावात सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार
By admin | Published: April 17, 2017 11:14 AM2017-04-17T11:14:37+5:302017-04-17T11:14:37+5:30
संशयित हिरामण याने या घटनेची वाच्यता केली तर पीडित मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली
शेजारच्याने केले कृत्य : आईच्या दुचाकीची चावी घेण्यासाठी गेली होती पीडित
जळगाव : शेजा:याकडे दुचाकीची चावी घेण्यासाठी गेलेल्या सात वर्षाच्या मुलीवर हिरामण बारकू चौधरी (रा.वडनगरी, ता.जळगाव ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) याने शहरातील मोहाडी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये बलात्कार केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी उघडकीस आली. दरम्यान, संशयित हिरामण याने या घटनेची वाच्यता केली तर पीडित मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी रस्त्यावर पीडित मुलगी व तिचे कुटुंब राहते. त्याच्याच शेजारी हिरामण चौधरी हा प}ी व मुलासह राहतो. त्यांच्यात घरोब्याचे संबंध होते, त्यामुळे हिरामण याला पीडित मुलीच्या आईने दुचाकी 8 दिवसापासून वापरण्यास दिली होती. शनिवारी पीडित मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. दुपारी तीन वाजता बाहेर जायचे असल्याने आईने मुलीला हिरामण याच्याकडे दुचाकीची चावी घेऊन येण्यास पाठविले होते.
धक्का मारुन पळाला संशयित
बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नसल्याने आई तिला पाहण्यासाठी गेली असता चौधरी यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावून आवाज दिला असता मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे घाबरलेल्या आईने शेजारच्यांना बोलावून घेतले. चौधरी याने घाईघाईने दरवाजा उघडला व धक्का मारला. या ‘गोष्टीची कुठे वाच्यता केली तर तुला जीवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देऊन पळ काढला.
चौधरी पळून गेल्यानंतर पीडित मुलगी रडत आईजवळ आली व तिने घडलेला प्रकार कथन केला. ही घटना ऐकून आई व शेजारचे कमालीचे हादरले. मुलीचे वडिल रात्री घरी आल्यानंतर त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. रविवारी दुपारी नातेवाईकांनी पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.