मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:44 PM2020-02-03T12:44:33+5:302020-02-03T12:44:48+5:30

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत उन्हाळा लागण्यापूर्वीच झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तलावाची ...

Rapid decrease in water level of Lake Mehru | मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

Next

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत उन्हाळा लागण्यापूर्वीच झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तलावाची पाणीपातळी दोन फुटाने कमी झाली आहे. तलावातून पाण्याचा उपसा वाढत असल्याने तसेच बाष्पीभवन होऊ लागल्याने पाणी पातळी कमी होत असल्याचे सांगितले जात असून याकडे महापालिकेने वेळीच लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ््यात तब्बल सहा वर्षांनतर मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला होता. मात्र पाणीपातळी टिकविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने आतापासूनच पातळी घटल्यास उन्हाळ््यामध्ये पाणी टिकते की नाही, अशी चिंतादेखील व्यक्त केली जात आहे.
मेहरुण तलाव हा पूर्वीपासूनच शहरवासीयांचे खास आकर्षण केंद्र असून त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमीही हातभार लावत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला. पावसाळ््यात मेहरुण तलावामध्ये लांडोरखोरीसहआजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असे, मात्र बांधकाम वाढल्याने हे स्त्रोत इतरत्र वळले आहे. परिणामी मेहरुण तलावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत गेल व मेहरुण तलाव गेल्या काही वर्षांपासून पूर्ण भरत नव्हता.
मात्र पावसाळ््यामध्ये मेहरुण तलावाला ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावाचा मोठा आधार झाला. गेल्या वर्षी उन्हाळ््यात वृक्ष संवर्धन समिती व मराठी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात येऊन अंबरझरा तलावापासून मेहरुण तलावापर्यंत चार कि.मी. लांबी व १५ फूट खोलीची चारी तयार केली. त्यामुळे पुन्हा अंबरझऱ्यातील खळखळाट मेहरुण तलावाकडे वळला. तंत्रशुद्ध चाºया तयार झाल्याने आॅगस्ट महिन्यातच तलाव ८० टक्के भरला व सप्टेंबर महिन्याच्या दुसºयाच आठवड्यात मेहरुण तलावाचा साठा १०० टक्क्यांवर पोहचला.
मनपाने लक्ष द्यावे
शहराचे वैभव असले तरी मनपाकडून मेहरुण तलावाकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप होत आहे. या परिसरात पाण्याचा उपसा होत असल्यास मनपाने पाहणी करून तो रोखावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच बाष्पीभवन रोखण्यासाठी पूर्वी तलावात रसायन टाकले जात असे. त्यामुळे पाणी टिकून राहत असे. आतादेखील तलावात रसायन टाकल्यास बाष्पीभवन कमी होईल, असे वाणी यांचे म्हणणे आहे.
तलावातील पाणी स्थीर, वाहून जाणे शक्य नाही
मेहरुण तलावातील पाणी हे स्थिर असते. ते वाहून जाणे शक्य नाही. उपसा व बाष्पीभवनमुळे पाण्याची पातळी कमी होऊन आताच दोन फुटाने कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हशींनादेखील अटकाव करावा, अशी मागणी होत आहे.

उन्हाळ््यापूर्वीच पाणीपातळीत घट
सहा वर्षांनंतर यंदाच्या पावसाळ््यात मेहरुण तलाव १०० टक्के भरला खरा, मात्र आता त्यातील पाणी पातळी टिकविण्यासाठी लक्ष दिले जात नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. एक तर या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर परिणाम झाला व आता या वाढत्या बांधकामांमुळे पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. बांधकामासाठी तलावातील पाण्याचा उपसा होण्यासह परिसरात या पाण्याचा वापरही वाढल्याने पाणीपातळी कमी होत असल्याची माहिती मिळाली. तलावाजवळच कुपनलिका होत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तलाव होतोय उथळ
गणेश विसर्जन असो की दुर्गा विसर्जन हे मेहरुण तलावात केले जाते. त्यामुळे मूर्तींची संख्या वाढत जाऊन तलावाची खोली कमी होत आहे व तलाव उथळ होत असल्याचे मराठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी यांचे म्हणणे आहे. खोली जास्त राहिल्यास तलावात पाणीदेखील जास्त साठू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हाळ््यात बाष्पीभवन झाले तरी पावसाळ््यापर्यंत पाणी टिकून राहण्यास मदत होत जाईल. त्यासाठी तलावात मोठ्या मूर्तींचे विसर्जन तलावात न करता इतरत्र करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मेहरुण तलावाच्या पाणीपातळीत दोन फुटाने घट झाली आहे. तलावातील पाणी टिकून राहण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- विजयकुमार वाणी, मराठी प्रतिष्ठान

Web Title: Rapid decrease in water level of Lake Mehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.