व्यापारात तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:55 PM2019-05-31T12:55:39+5:302019-05-31T12:56:10+5:30
१५०० जिवनाश्यक वस्तुंचा व्यापार
दाणा बाजार ही जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात स्थित अशी मुख्य बाजारपेठ आहे़ विविध अशा १५०० जिवनाश्यक वस्तुंचा येथे व्यापार होतो़ १९२० पासून हा बाजार शहरात आहे़ स्थानिक पातळीवरून, राज्य, देश आणि विदेशातही या बाजारातून व्यवहार होत असतात़ २५० ते ३०० व्यापारी आणि त्यांच्याकडील कामगार अशा एक हजार ते १५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारातून चालतो़ मोठी उलाढाल नियमित येथून होत असते़ पूर्वी १९९० ते ९५ च्या दरम्यान हा बाजार देशात प्रथम क्रमांकावर होता़ त्यानंतरच्या काळात अगदी झपाट्याने नवीन तंत्रज्ञान विकसीत झाले़ इलेक्ट्रॉनिक काटे, डिजिटल पेमेंट, पॅकींग, कॉम्प्युटवर बिलींग अशा बऱ्याच पद्धतीने हे तंत्रज्ञान आले व व्यापाऱ्यांनीही हे बदललेले तंत्रज्ञान बदलत्या काळानुसार स्वीकारले आहे. २०१० ते २०१९ या ९ वर्षात हा बदल अगदीच झपाट्याने झाला़ मॉल संस्कृती, आॅनलाईन मार्केटींग या काळातही दाणाबाजाराची विश्वासहर्ता आजही टिकून आहे़ कुठलाही छोटा मोठा व्यापारी जास्त माल घेण्यासाठी दाणाबाजारालाच पसंती देत असतो़ बदलत्या काळानुसार व्यापाºयांची येणारी पिढी मात्र या बाजारात स्थिरावेल का याबाबत शंका आहे़ गेल्या दहा ते पंधरा वर्षात हवा तसा विकास झालेला नाही़ व्यापाराला पोषक असं वातावरण निर्माण झाले नाही़ त्यामुळे मोठा नफा येथे येत नाही़ अशा स्थितीत नव्या पिढीला जलद व जास्त मोबदला हवा असतो, त्यामुळे ही पिढी येणार की नाही यात शंका आहे़
-प्रविण पगारीया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन