भुसावळात एटीएममध्ये महिनाभरापासून खडखडाट
By admin | Published: June 18, 2017 05:44 PM2017-06-18T17:44:53+5:302017-06-18T17:44:53+5:30
महिनाभरापासून शहरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.18 : नोटबंदी होवून तब्बल सात महिने उलटले तरीदेखील शहरातील एटीएम पूर्वपदावर आले नसल्याने ग्राहकांची गैरसोय कायम आह़े महिनाभरापासून शहरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
नोटबंदीला सात महिने उलटले तरीदेखील राष्ट्रीय बँकांसोबत खाजगी बँकांनीही एटीएम सेवा नियमित सुरू न केल्याचे चित्र शहरात आह़े वास्तविक 24 तास ग्राहकांना एटीएम सेवा पुरवणे हे बँकांचे कर्तव्य आह़े प्रत्येक महिन्यात चार व्यवहारानंतर बँका पाचव्या व्यवहारासाठी मोठय़ा प्रमाणावर चाज्रेस आकारतात, मात्र असे असतानाही सुरळीत एटीएम सुरू नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत़
शहरातील सुमारे दहावर बँकांचे एटीएममध्ये महिनाभरापासून रोकडच नाही़ अपवादात्मकरीत्या रोकड टाकली जात असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आह़े शहरातील स्टेट बँक, अॅक्सीस, बँक ऑफ इंडिया, युनियन, बडोदा, पंजाब नॅशनल, महाराष्ट्र बँकेचे एटीएम शोपीस ठरत आहेत़