शिवसेनेतर्फे दळवेल येथे रास्तारोको

By admin | Published: June 4, 2017 01:00 PM2017-06-04T13:00:41+5:302017-06-04T13:00:41+5:30

पारोळा : महामार्गावर दूध फेकले

The Rashtravadi from Shivsena at Dalwale | शिवसेनेतर्फे दळवेल येथे रास्तारोको

शिवसेनेतर्फे दळवेल येथे रास्तारोको

Next

ऑनलाईन लोकमत

पारोळा,दि.4 - शेतक:यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेती मालाला हमी भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज सकाळी 9 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दळवेल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
सकाळी 9 वाजेच्या सुमारास जवळपास हजार-दीड हजार शेतकरी महामार्गावर जमले. त्यांनी रास्तारोको करून, भाजीपाला रस्त्यावर फेकला. तसेच दूधाचे पाच कॅन रस्त्यावर सांडले. त्यांनतर शेतक:यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. 
रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने पाच किलोमीटर अंतरार्पयत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. अर्धातास आंदोलन सुरू होते. यावेळी शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या.  यावेळी जि.प.सदस्या र}ाबाई पाटील, दळवेलचे सरपंच रोहीदास पाटील, कृउबा सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे चेअरमन चतुर पाटील, सेनेचे तालुकाध्यक्ष प्रा.आर.बी.पाटील, माजी नगरसेवक राजू कासार, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह दळवेल, मोंढाळे, सबगव्हाण, पिंपळकोठा, इंधवे, जिराळी, सुमठाणे, बहादरपूर, शिरसोदे या भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: The Rashtravadi from Shivsena at Dalwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.