पाचोऱ्यात काव्य मैफलीत रसिक लोटपोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:02 PM2018-11-23T22:02:08+5:302018-11-23T22:04:34+5:30

नगरपरिषद आणि महात्मा गांधी वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी पाचोरेकरांनी मनमुराद अनुभवली.

Rasik Lottpot in Poetry concert | पाचोऱ्यात काव्य मैफलीत रसिक लोटपोट

पाचोऱ्यात काव्य मैफलीत रसिक लोटपोट

Next
ठळक मुद्देपाचोरा येथे शारदीय व्याख्यानमालाविनोदी काव्य मैफिलीत रसिक लोटपोटशेरोशायरीतून आणि काव्यातून हास्य कल्लोळ

पाचोरा - 'इश्क तो बेहिसाब कर डाला,
खुद को बासी कबाब कर डाला,
उसने पाव रखा जो पानी में,
सारा पानी शराब कर डाला
घिर कर मुझको मेरे सालों ने
अगला पिछला हिसाब कर डाला...'
यासारख्या अनेक उर्दू आणि हिंदी शेरोशायरी आणि काव्याची मेजवानी येथील नगरपरिषद आणि महात्मा गांधी वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी पाचोरेकरांनी मनमुराद अनुभवली.
सुंदर मालेगावी आणि त्यांचे सोबत रोबोट मालेगावी, इब्राहिम सागर, गडबड मालेगावी, इस्माईल फन यांनी विनोदी काव्य मैफिल सादर केली. साबिर मुस्तफा आबादी यांच्या सूत्र संचालन आणि शेरोशायरीने रसिक मंत्रमुग्ध झाले आणि ही काव्य मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. सुंदर मालेगावी यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या शेरोशायरीतून आणि काव्यातून हास्य कल्लोळ माजवला .
‘बुझी बुझी है तबीयत मेरी
तू हरी कर दे
तू आ जा पास मेरे
मुझे गुदगुदी कर दे...’,
यासारखे विनोदी शेर धमाल उडवून गेले तर
‘लोग कहते हैं काला हूं ,गंजा हूं मैं,
मां तो कहती है, घर का उजाला हूं मैं!’
यासारखे हृदयस्पर्शी शेर देखील सुंदर मालेगावी यांना दाद देऊन गेले. सामान्य कुटुंबातील आणि सामान्य व्यवसाय क्षेत्रातील असलेल्या या असामान्य उर्दू शायर आणि कवींनी प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवत तब्बल अडीच तास खिळवून ठेवले.
उपनगराध्यक्ष शरद पाटे, नसीर बागवान, साहेबराव पाटील, खलील देशमुख, सुंदर मालेगावी, महेश कौंडिण्य यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन केली. सूत्रसंचालन ललित सोनार यांनी केले.

Web Title: Rasik Lottpot in Poetry concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.